‘आप’ ला निवडा आणि भ्रष्टाचार रोखा : क्रुझ

भाजप (BJP) पक्षाला पुन्हा निवडून आणल्यास राज्यातील बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचारात आणखीन भर पडेल..
‘आप’ ला निवडा आणि भ्रष्टाचार रोखा : क्रुझ
Goa Politics : आम आदमी पार्टी Dainik Gomantak

सासष्टी: राज्यात बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार वाढत चाललेला असून भाजप (BJP) पक्षाला पुन्हा निवडून आणल्यास यात आणखीन भर पडणार आहे. राज्यात वाढत्या भ्रष्टाचारावर रोख लावून सर्वत्र विकास घडवून आणण्यासाठी आप पक्षाला (Goa Politics) निवडून आणणे आवश्यक बनले आहे, असे वेळ्ळीचे आम आदमी पक्षाचे नेते क्रुझ सिल्वा यांनी सांगितले. आगामी निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर आज आम आदमी पक्षाने वेळ्ळी मतदारसंघातून प्रचाराला सुरुवात केली.

Goa Politics : आम आदमी पार्टी
पाळी प्रकल्पासाठी ३ कोटीची तरतूद..!

यावेळी क्रुझ सिल्वा यांनी वरील उद्‌गार काढले. राज्यात महागाई वाढलेली असून कोरोनामुळे आर्थिकरित्या फटका बसलेला गोव्यातील सर्वसामान्य नागरिक आज आर्थिकरित्या संकटात पडलेला आहे. गोव्यातील नागरिकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आप पक्ष हा शेवटचा पर्याय राहिला आहे, असे क्रुझ यांनी सांगितले.

रेल्वे रुळाचे दुपदरीकरण, किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा व अन्य जनविरोधी प्रकल्प हे लोकांच्या फायद्यासाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी आणलेले आहे. या जनविरोधी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गोमंतकीय नागरिक आज आंदोलन करत आहे. पण, या भाजप सरकारला गोमंतकीय जनतेचे काहीही पडून गेलेले नाही, असे क्रुझ यांनी सांगितले. भाजप सरकार स्मार्ट सिटी बनविण्याची घोषणा करीत असून आप पक्ष निवडून आल्यास स्मार्ट गाव बनविण्यावर भर देणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com