Goa Politics: तरुणांच्या रोजगारावरून भाजप-आप आमनेसामने !

येत्‍या 30 नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकार दहा हजार बेरोजगारांना नोकरी देणार असल्याचे वक्तव्‍य नुकतेच आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी केले होते (Goa Politics)
Goa Politics: Cold war between BJP & AAP on Job opportunities
Goa Politics: Cold war between BJP & AAP on Job opportunities Dainik Gomantak

पणजी: येत्‍या 30 नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकार (Goa Government) दहा हजार बेरोजगारांना नोकरी (Jobs) देणार असल्याचे वक्तव्‍य नुकतेच आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे (Health Minister Vishwajeet Rane) यांनी केले होते. या नोकऱ्या दिलेल्‍या मुदतीत सरकार कशा देणार याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे. आम्ही घोषणा केली तर ते अशक्य असल्याचे म्हणतात, मग तुम्हाला कसे शक्य आहे ते सांगा, असे थेट आव्‍हान आम आदमी पक्षाचे (AAP) राज्य संघटक राहुल म्हांबरे यांनी सरकारला दिले आहे. (Goa Politics: Cold war between BJP & AAP on Job opportunities)

Goa Politics: Cold war between BJP & AAP on Job opportunities
Goa Vaccination: राज्यात लवकरच 100 टक्‍के लसीकरण पूर्ण होणार,आरोग्य मंत्र्यांचे प्रतिपादन

नोकऱ्यांबाबतची सरकारची घोषणा पुन्हा एकदा जुमला ठरली आहे. दहा हजार नकोच, या वर्षाच्या अखेरपर्यंत किमान एक हजार तरी नोकऱ्या सरकारने सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण करून देऊन दाखवाव्‍यात असे आव्‍हान यापूर्वीच आम्‍ही सरकारला दिले होते. मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत हेसुद्धा जिल्हा पंचायत निवडणुकीपासून गोवेकरांना नोकऱ्यांचे आश्वासन देत आहेत. पण नोकऱ्या आहेतच कुठे? एकही जाहिरात पाहिली नाही, असे म्‍हांबरे म्‍हणाले.

400 कोरोनायोद्ध्‍यांना मागील पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचे वृत्त यादरम्यान येऊन धडकले. त्यामुळे जे सरकार कोविड योद्ध्यांना पैसे देऊ शकत नाही ते गोव्यात दहा हजार नवीन नोकऱ्या कशा देणार? असा सवाल म्हांबरे यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com