काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षात युती होणारच; चर्चिल आलेमाव

युतीसाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख; राष्ट्रवादीकडून काँग्रेसपाशी 10 जागांची मागणी
Goa politics : Congress and NCP will form an alliance statment by  Churchill Alemao
Goa politics : Congress and NCP will form an alliance statment by Churchill AlemaoDainik Gomantak

मडगाव: गोव्यात येत्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly) काँग्रेस आणि राष्ट्रवादी (Congress) या पक्षात युती होणारच असा विश्वास बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (MLA Churchill Alemao) यांनी व्यक्त करताना आम्हाला काँग्रेसकडून (Goa Politics) 10 जागा सोडण्याची अपेक्षा आहे असे सांगितले.

Goa politics : Congress and NCP will form an alliance statment by  Churchill Alemao
सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह पावसाचा तडाखा.. !

काँग्रेसची युतीसाठी राष्ट्रवादीसह वेगवेगळ्या पक्षांकडे बोलणी चालू आहेत असे काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी स्पष्ट केल्यानंतर आम्हाला निदान 10 जागा काँग्रेसने सोडण्याची गरज असल्याचे आलेमाव म्हणाले.यासंदर्भात त्याना विचारले असता, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस नेत्यांकडे बोलले आहेत. गोव्यात युती होणारच हे त्यांनी आम्हाला सांगितले आहे, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसने युतीबद्दल 30 नोव्हेंबर पर्यंत घोषणा करावी अशी आमची अपेक्षा आहे. ही घोषणा नंतर झाल्यास दोन्ही पक्षासाठी ते त्रासदायक ठरू शकते असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com