सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच उमेदवारी देऊ

Goa Politics पी. चिदंबरम : मांद्रे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची सभा
सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच उमेदवारी देऊ
Goa Politics Congress election observer and former Union Minister; P. ChidambaramDainik Gomantak

Morjim: मांद्रे मतदारसंघाची कॉंग्रेसची (Congress) उमेदवारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून जो उमेदवार कार्यकर्ते सुचवतील तोच उमेदवार दिला जाईल, त्यासाठी इच्छुकांनी तळागाळात जावून पक्षाचे काम पोचवावे आणि 2022 साली कॉंग्रेसचे सरकार राज्यात आणूया, असे आवाहन कॉंग्रेसचे निवडणूक निरीक्षक (Congress election observer) आणि माजी केंद्रीयमंत्री (former Union) पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी मांद्रे येथील जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या कॉंग्रस कार्यकर्त्यांच्या सभेत केले.

Goa Politics Congress election observer and former Union Minister; P. Chidambaram
माजी गोवा राज्यपाल 'सत्यपाल मलिक' यांची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका

यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष बाबी बागकर, निरीक्षक गुंडू राव, माजी मंत्री संगीता परब, युवा कॉंग्रेस नेते सचिन परब, महिला अध्यक्ष रेखा परब, कॉंग्रेस नेते आश्विन खलप, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, कॉंग्रेस गट अध्यक्ष नारायण रेडकर उपस्थित होते. माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम यांनी देशात महागाई वाढली आहे. आता भाजप सरकार खाली खेचण्याची गरज आहे आणि त्याची सुरवात मांद्रे मतदारसंघातून करण्याचे आवाहन केले.

Goa Politics Congress election observer and former Union Minister; P. Chidambaram
पेडणे तालुक्यात राजकीय समीकरणांना वेग; गोवा फॉरवर्डला बसणार फटका

आपण पुन्हा पुन्हा या मतदारसंघात कार्यकर्त्यांकडे संपर्क साधणार असे सांगून जे कोणी काम करतील त्यालाच उमेदवारी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

उमेदवारी जाहीर करण्याची मागणी

कॉंग्रेस कार्यकर्ते प्रमेश मयेकर, प्रदीप हरमलकर यांनी यावेळी कॉंग्रेसचे गट अध्यक्ष नारायण रेडकर यांच्याविषयी नाराजी व्यक्त करून जे कोणी कॉंग्रेसचे काम करत नाहीत, त्यांना उमेदवारी देवू नये. शिवाय उमेदवारी आताच जाहीर करण्याची जोरदार मागणी केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com