दाबोळीच्या कॉँग्रेससच्या पदाधिकाऱ्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

तृणमूल पक्ष गोव्यात विकासाबरोबरच जनतेच्या गरजा पुरवण्यासाठीही घेणार पुढाकार
दाबोळीच्या कॉँग्रेससच्या पदाधिकाऱ्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
Goa TMC मध्ये दाबोळी काँग्रेस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश करताना, बरोबर राज्यसभा खासदार डॉ. शांतनु, लवू मामलेदार.Dainik Gomantak

Goa Politics: देशात तृणमूल काँग्रेसच (TMC) भारतीय जनता पक्षाला (BJP) टक्कर देण्यास समर्थ आहे. गोव्यात तृणमूल पक्ष विकासाबरोबर येथील जनतेच्या गरजा पुरवण्यासाठी पुढाकार घेणार आहे. पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त गोव्याला भाजप सरकारने अनेक बाबतीत मागे घेऊन गेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डॉ. शांतनु सेन (TMC MP Dr Shantanu Sen) यांनी दिली.

Goa TMC मध्ये दाबोळी काँग्रेस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश करताना, बरोबर राज्यसभा खासदार डॉ. शांतनु, लवू मामलेदार.
Goa: पहिली सायबर फॉरेन्सिक लॅब कर्यान्वित

वास्को येथे आयोजित गोवा तृणमूल काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत वरील माहिती डॉ. सेन यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार तथा गोव्याचे तृणमूल काँग्रेसचे नेते लवू मामलेदार उपस्थित होते. यावेळी दाबोळी काँग्रेस मंडळाचे गटाध्यक्ष महेश भांडारी, दाबोळी युवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष शुभम तिळोजी, सरचिटणीस आत्माराम शेटकर, मनोहर भांडारी, विजय हीत्यादी, नाझीर शिरगावकर, सज्जन कामत, संदेश तळेकर, सतीश सित्रे, संजू बडी, कुमार भटीला, हनमंता कलभुर्गी यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला. पुढे पत्रकारांना माहिती देताना डॉ. सेन म्हणाले की गोव्यातील जनता भाजप सरकारवर नाराज असून त्यांच्याकडून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जीला मिळणार असल्याची माहिती डॉ. सेन यांनी दिली. देशाबरोबर गोव्यात भाजप सरकारने जनतेला महागाईत टाकलेली असून सामान्य जनता भाजप पक्षावर नाराज आहे. जनतेचे प्रश्न हाताळण्यास स्थानिक सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दाबोळीचे आमदार गोवा सरकारमध्ये मंत्री असून त्याने येथील युवकांना रोजगार देण्यासाठी अजिबात पुढाकार घेतला नसल्याची माहिती डॉ. सेन यांनी दिली.

Goa TMC मध्ये दाबोळी काँग्रेस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश करताना, बरोबर राज्यसभा खासदार डॉ. शांतनु, लवू मामलेदार.
Goa: राज्यात आज कोरोनामुळे एकही बळी नाही

गोव्यातील तृणमूल काँग्रेसचे नेते लवू मामलेदार यांनी सांगितले की तृणमूल पक्ष हा जनतेचा असून त्याला गोव्यातील जनतेने स्वीकारायला सुरुवात केली आहे. येथील जनतेला काँग्रेस पक्षावर विश्वास नसून त्यांच्यासमोर एकच पर्याय म्हणजे राष्ट्रीय तृणमूल काँग्रेस. पूर्वीचे भाजप सरकार जनतेसाठी काम करण्यासाठी पुढाकार घेत होते. सध्याचे भाजप सरकार जनतेचे नसून स्वतः पुरते असल्याची माहिती मामलेदार यांनी दिली. गोव्यातील काँग्रेस सरकारवर सुद्धा जनतेचा विश्वास राहिला नसल्याची माहिती मामलेदार यांनी दिली. दाबोळी काँग्रेसगट माजी अध्यक्ष महेश भंडारी यांनी दाबोळी मतदार संघात विविध प्रश्न असून त्यांना दुजोरा देण्यासाठी काँग्रेस पक्षाने मला कधीच पाठिंबा दिला नाही. काँग्रेस पक्ष दाबोळीत असून नसल्यासारखा असल्याची माहिती भंडारी यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com