मयेत सरकार विरोधात घोषणा..!

‘म्हारगायेचो जागोर’ अभियानाला विठ्ठलपूरात प्रतिसाद..
मयेत सरकार विरोधात घोषणा..!
Goa Politics : मयेत सरकार विरोधात घोषणा..! Dainik Gomantak

डिचोली : मये मतदारसंघात काँग्रेसचे (Congress) ''म्हारगायेचो जागोर'' अभियान जोरात सुरु असून, आज (रविवारी) मतदारसंघातील विठ्ठलापूर-कारापूर भागात हे अभियान राबविण्यात आले. काँग्रेसचे गोव्याचे (Goa) प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्या उपस्थितीत भाजप सरकार विरोधात घोषणा देत (Goa Politics), विठ्ठलापूर येथील श्री पांडुरंग मंदिराकडून या अभियानाला प्रारंभ झाला.

Goa Politics : मयेत सरकार विरोधात घोषणा..!
तमाम गोमंतकियांचा भाजपला 'इशारा'..

काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके, मये मतदारसंघाचे प्रभारी अनंत पिसूर्लेकर, मयेतील संभाव्य उमेदवार ॲड. अजय प्रभुगावकर, पिळगावचे माजी सरपंच आणि प्रदेश समितीचे दिलीप गावस, मये गट काँग्रेसचे अध्यक्ष राजेश गावकर, काँग्रेसचे कार्यकर्ते मेघ:श्याम राऊत, पिळगावचे माजी सरपंच बाबाजी गावकर, विनोद धुरी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी घरोघरी भेट देऊण भाजप सरकारचे अपयश आणि वाढत्या महागाईबाबत जनजागृती केली. नागरिकांना पत्रके वितरीत करतानाच, येत्या निवडणुकीत काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन केले. विजय भिके आणि ॲड. अजय प्रभुगावकर यांनी यावेळी बोलताना भाजप सरकारने सर्व बाजूनी जनतेला वेठीस धरले आहे, अशी टीकाही त्यांनी केले.

देश संकटात

महागाईने कळस गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून या सरकारने सर्वसामान्य जनतेला जीणेच असह्य केले आहे. सर्वसामान्यांना घरखर्च चालविणे कठिण होत आहे. देशाची आर्थिक स्थितीही कमकुवत झाली असून, देश संकटात आहे. अशावेळी भाजपला सत्तेपासून दूर करणे हाच पर्याय जनतेसमोर आहे, असे दिनेश गुंडू राव यांनी सांगून, काँग्रेसला सत्तेवर आणावे, असे आवाहन केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com