अनेक पक्षांत प्रवेशासाठी अतितटीची चढाओढ

पार्श्वभूमी न तपासता नेते, कार्यकर्त्यांची नोंदणी
अनेक पक्षांत प्रवेशासाठी अतितटीची चढाओढ
Goa Politics प्रवेशासाठी अनेक पक्षांत चढाओढDainik Gomanatk

पणजी: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुमधडाका सुरू केला आहेच, त्याचबरोबर प्रवेश देण्यामध्येही त्यांच्याकडून चढाओढ सुरू झाली आहे. विविध पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांनी उमेदवारीचे लक्ष्य ठेवून प्रवेश सुरू केला आहे. प्रवेश घेणाऱ्यांची पार्श्‍वभूमी न बघता पक्षाची नोंदणी अधिकाधिक वाढवण्याकडे या पक्षांचा सध्या कल आहे. हे प्रवेश करणारे नेते व कार्यकर्ते पक्षाची उमेदवारी घोषित झाल्यावर टिकून राहतील की बंडखोर बनतील याचीच मतदारांना शंका आहे.

Goa Politics प्रवेशासाठी अनेक पक्षांत चढाओढ
'तिळारी'चे दुरुस्तीकाम दुसऱ्या दिवशीही बंद

काही दिवसांपूर्वी गोव्यात दाखल झालेल्या तृणमूल काँग्रेसने इतर पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना ऊठसूठ प्रवेश देणे सुरू केले आहे. त्यांना पक्षाची सदस्यनोंदणी करण्याबरोबरच इतर राजकीय पक्षांमध्ये त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादाचा दरार निर्माण करायचा आहे. यात काँग्रेस व आम आदमी पक्ष (आप) हे सुद्धा मागे नाहीत. गोव्यातील व्यावसायिक क्षेत्रातील तरुण तसेच इतर राजकीय पक्षातील नेते व माजी आमदारही दिल्लीत जाऊन ‘आप’चे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटून प्रवेश घेण्याचे प्रकार सुरू आहेत. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले काही नेते ते सध्या असलेल्या पक्षात डाळ शिजणार नाही (Goa Politics) , असे संकेत मिळाल्याने दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत.

Goa Politics प्रवेशासाठी अनेक पक्षांत चढाओढ
गोव्यात दीदींची नवीन खेळी, गोवा फॉरवर्डला युतीची ऑफर

तृणमूलचा सपाटा

तृणमूल काँग्रेसने राज्यभर विविध क्षेत्रातील लोकांना तसेच नामांकित व्यक्तींना त्यांच्याकडे वळवण्यास प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये त्यांना काहीसे यशही मिळाल्याचे दिसत असले तरी त्यातील कितीजण लोकांशी संवाद साधण्यास घराबाहेर पडतील, हा सुद्धा गहन प्रश्‍न आहे. या पक्षाने माजी आमदार तसेच महिलांना तृणमूल काँग्रेसच्या सुप्रिमो ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये महिलांसाठी करत असलेले कार्य महिलांसमोर ठेवून त्यांना पक्षाकडे आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

काँग्रेस, आम आदमी पक्षही पुढे

नेत्यांची व कार्यकर्त्यांची सुरू असलेली फोडाफोडी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. जे भाजप कार्यकर्ते व नेते नाराज आहेत ते इतर पक्षांकडे जाण्याचा रस्ता पत्करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी विद्यमान सर्व भाजप आमदारांना उमेदवारी मिळणार नाही, असे उघड केल्याने या भाजप आमदारांमध्येच अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळेच भाजपचेच काही विद्यमान आमदार इतर पक्षांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांमधून उमेदवारी मिळवण्यासाठी उमेदवारांची भाऊगर्दी होण्याबरोबरच उमेदवारी न मिळणाऱ्या बंडखोरांची जंत्रीही मोठी असण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com