रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर..

राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारांची घोषणा करणारा गोवा सुराज पक्ष हा पहिला पक्ष
रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर..
Goa Politics First list of 9 candidates of Revolutionary Goans Announced Dainik Gomantak

Goa Politics : रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या (Revolutionary Goans) 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून यामध्ये सांतआंद्रे: विरेश बोरकर, प्रियोळ: विश्वेश नाईक, मये: श्रीकृष्ण परब, मांद्रे: सुनयना गावडे, कुडचडे: आदित्य देसाई, कुडतरी: रूपर्ट पेरेरा, नुवे: अरविन डिकॉस्टा, कळंगुट: फ्रान्सिस्को गोन्साल्वीस, कुंकळ्ळी: विल्सन कार्दोज यांचा समावेश आहे. दरम्यान प्रचाराच्या रणधुमाळीसाठी कार्यकर्ते आता तयार झाले आहेत.

Goa Politics First list of 9 candidates of Revolutionary Goans Announced
भाजप म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष: राहुल म्हांबरेंचा सरकारवर निशाणा

राजधानी पणजीत भव्य सभा घेऊन सर्व राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेणाऱ्या रिव्होल्युशनरी गोअन्सच्या (आरजी) गोवा सुराज पक्षातर्फे उमेदवारांची पहिली यादी आज घोषित करण्यात येणार असल्याची माहिती ‘आरजी’च्या नेत्यांनी दिली. त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारांची घोषणा करणारा गोवा सुराज पक्ष हा पहिला पक्ष ठरला आहे.

हल्लीच आरजीने गोवा सुराज पक्षाच्या चिन्हावर चाळीसही मतदारसंघात कोणाशीही युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे चाळीसही मतदारसंघात बहुतेक उमेदवार निश्‍चित झाले असून ते विविध धर्मातील तसेच विविध क्षेत्रातील आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com