Goa Politics : विद्यार्थ्यांना मोफत व्हायफाय इंटरनेट सुविधा

लॉकडाऊन (Lockdown) काळात विद्यार्थ्यांचे (Students) शिक्षण थांबू नये म्हणून सरकारने ऑनलाईन शिक्षण (Online learning) पद्धत सुरु करण्याचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्षातही घेतलेला आहे .
Goa Politics : विद्यार्थ्यांना मोफत व्हायफाय इंटरनेट सुविधा
Dainik Gomantak

मोरजी : शिक्षण खात्याने ग्रामीण भागात इन्टरनेट (Internet) सेवा विद्यार्थ्यांसाठी (Students) उपलब्ध आहे कि नाही , विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन (Smart phone) घेण्याची क्षमता आहे कि नाही , याची चौकशी (Inquiry) न करता थेट सरकारने ऑनलाईन शिक्षण (Online learning) सुरु करून विद्यार्थी आणि पालकांना चिंतेत टाकले आहे .

याची गंभीर दखल घेत मांद्रे मतदार संघातील गरजवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत (Free) व्हायफाय इन्टरनेट (Wi Fi Internet) सेवा मगोचे जीत आरोलकर व आमदार दयानंद सोपटे यांनी सुरु केली आहे.

Goa Politics : विद्यार्थ्यांना मोफत व्हायफाय इंटरनेट सुविधा
Goa : पायीवारीचा ‘उदय’संकल्‍प

मगोचे जीत आरोलकर यांनी सर्वात प्रथम मांद्रे पंचायत क्षेत्रात पंचायत सभागृहात १९ रोजी सेवा कार्यरत केली , तर मांद्रेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळ चेरमेन दयानंद सोपटे यांनी 20 रोजी पार्से पंचायत क्षेत्रातील विधार्थ्याना मोफत इन्टरनेट सेवा उपलब्ध करून देण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला .

मांद्रे मतदार संघातील भारतीय संचार निगम तर्फे ग्राहकाना पुरवण्यात येणारी इन्टरनेट सेवा बेभरवशाची बनली आहे .त्यामुळे अनेकांनी भारतीय संचार निगम सेवा खंडित करून इतर कंपन्याकडून इन्टरनेट सेवा उपलब्ध करून घेतली आहे .

Goa Politics : विद्यार्थ्यांना मोफत व्हायफाय इंटरनेट सुविधा
Goa: वीज ग्राहकांना 300 युनिट मोफत विजेचा फायदा होणार नाही - वीजमंत्री

लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरु करण्याचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्षातहि घेतलेला आहे . काही ठिकाणी शिकवण्या सुरूही झाल्या . मात्र ऑफलाईन असलेल्या विधार्थ्याना किंवा शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण देताना आणि घेताना मोठे आव्हान समोर राहिले आहे . ज्याना मोबाईल हाताळायला जमत नाही ते बालविद्यार्थी त्याचा कसा वापर करतील , ज्यांच्या घरात दोन चार मुले आहेत ते एका मोबाईलवर ऑन लाईन शिक्षण कसे घेणार, याचा सरकारने सर्वांगीण विचार केला नाही . एका बाजूने शिक्षक पालक तज्ञ सांगत असतात मुलांना मोबाईल देवू नका , त्यांच्या हातात मोबाईल पडला तर त्याचा गैर वापर होणार नाही कश्यावरून ? कधी कधी विजेच्या लंपडावाने रेंजच नाही त्यांच्या अडचणी ऑफ लाईन शिक्षण कसे देणार त्यासाठी शिक्षकांनी व्यवस्थापन समितीने विचार करावा .

Goa Politics : विद्यार्थ्यांना मोफत व्हायफाय इंटरनेट सुविधा
Goa: पेडणे पोलिसांनी पर्यटकांना लुटलेल्या आंतरराज्य ४ चोरट्यांना अटक

पेडणे तालुक्यात सरकारी प्राथमिक शाळा 68 , अनुदानित शाळा २४ , सरकारी हायस्कूल ६ , सरकारी उच्चमाध्यमिक १ , चार अनुदानित उच्चामाधामिक अशी शिक्षण संस्था आहेत , सरकारी शाळांमध्ये किमान १८० शिक्षक , अनुदानित हायस्कूल मध्ये १५० पेक्षा जास्त उच्चमाध्यामिक विद्यालयात १०० पेक्षा जास्त शिक्षक आहेत हे सर्व शिक्षक विद्यादानाचे कार्य करत आहेत .

Goa Politics : विद्यार्थ्यांना मोफत व्हायफाय इंटरनेट सुविधा
Goa: राजदीपच्या गाडीवरील हल्‍ला हे षडयंत्र

जीत आरोलकर

मगोचे नेते जीत आरोलकर यांनी प्रतिकिया देताना सरकारने अगोदर इन्टरनेट सेवा उपलब्ध करायला हवी होती , ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही त्याना तशी सोय करायला हवी होती , ती करताच ऑनलाईन शिकवण्या सुरु झाल्या , विधार्थ्यान्चा वेळ वाया जावू नये त्यासाठी ज्या ज्या गावात जागा उपलब्ध पंचायत करून देणार त्याठिकाणी मोफत व्हायफाय सेवा उपलब्ध करून देणार ,. जे गरजवंत आहेत त्याना हि सोय मोफत असेल असे जीत आरोलकर यांनी सांगून त्याचा शुभारंभ 19 रोजी करण्यात आला असे त्यांनी सांगितले .

Goa Politics : विद्यार्थ्यांना मोफत व्हायफाय इंटरनेट सुविधा
Goa : होंडा इंडस्ट्रीयल इस्टेट दुर्गंधी विरोधात स्थानिकांच आंदोलन

आमदार दयानंद सोपटे

मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी प्रतिक्रिया देताना गरजवंत विधार्थ्याना गावागावात मोफत इन्टरनेट सेवा उपलब्ध करून देण्याचा आपण संकल्प सोडला आहे , सरकार आपल्या पद्धतीने चोफेर विचार करून योजना आखत आहे , काहीजण आपल्याला राजकीय फायदा मिळावा यासाठी सरकारवर टीका करतात , पार्से येथे पंचायत सभागृहात गरजवंत विधार्थ्यासाठी हि सेवा मोफत असेल त्याचा शुभारंभ 20 रोजी केल्याचे सांगितले .

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com