Goa Politics: मांद्रे मतदार संघातील कॉंग्रेसची उमेदवारी सतीश शेटगावकरांना?
Goa Politics: Satish ShetgaonkarDainik Gomantak

Goa Politics: मांद्रे मतदार संघातील कॉंग्रेसची उमेदवारी सतीश शेटगावकरांना?

कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली तर निवडणूक लढवण्यास तयार आहे

मोरजी: आगामी विधानसभेच्या निवडणुकीत (Goa Assembly Election) कॉंग्रेसची (Congress) उमेदवारी मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर (Satish Shetgaonkar) याना द्यावी यासाठी जेष्ठ कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राज्य कॉंग्रेस नेत्यांकडे मागणी केली आहे. त्यासाठी योग्य ती फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे.

कॉंग्रेस पक्षाने नुकतेच 80 टक्के उमेदवारी युवकाना देणार असल्याचे जाहीर केल्याने ती उमेदवारी पंच सदस्य, सरपंच ते जिल्हा सदस्य पर्यंत मजल मारलेल्या सतीश शेटगावकर यांनाच द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मांद्रे मतदार संघातील भाजपचे आमदार दयानंद सोपटे यांना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसने सतीश यांना उमेदवारी दिल्यास हि जागा कॉंग्रेसला मिळवून देण्याची ग्वाही जेष्ठ कार्यकर्त्यांनी दिली आहे. त्याचा विचार करून दुसऱ्यांदा मोरजीतील उमेदवाराला लोकप्रतीनिधीत्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी जेष्ठ कॉंग्रेस कार्यकर्त्ये आणि आगरवाडाचे माजी सरपंच सीताराम राऊत यांनी केली आहे.

Goa Politics:  Satish Shetgaonkar
Goa: युतीबाबत राष्ट्रवादीही संभ्रमात; गोवा फॉरवर्डची सावध पावले

मांद्रेचे भाजपचे आमदार दयानंद सोपटे यांना टक्कर देण्यासाठी आता पासूनच कॉंग्रेस पक्षाने आपले कार्य सुरु केले आहे. या मतदार संघातील स्थानिक उमेदवार म्हणून जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा आणि मगो पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून सतीश शेटगावकर यांनी बाजी मारली आहे. तेच आमदार सोपटे यांना टक्कर देवू शकतात असे जेष्ठ कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मांद्रे मतदार संघातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी सचिन परब, रमाकांत खलप, बाबी बागकर हे शर्यतीत असताना जिल्हा पंचायत सदस्य असलेले सतीश शेटगावकर शर्यतीत असल्याने आता जेष्ठ कॉंग्रेस कार्यकर्त्ये सतीश शेटगावकरांना उमेदवारी द्यावी म्हणून एकजूटिने कार्यरत आहे.

Goa Politics:  Satish Shetgaonkar
Goa: म्हावळींगेतील 'फायरींग तळ' असुरक्षित -गोवा फॉरवर्ड

नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत सतीश शेटगावकर यांनी अपक्ष उमेदवार असूनही भाजपा, मगो आणि कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा पराभव करून आपणही आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.

सतीश शेटगावकर यांनी मागच्या सहा महिन्यापासूनच वैयक्तिक पातळीवर मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. कॉंग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यासाठी एक गट कार्यरत झाला आहे. माजी सरपंच अमोल राऊत यांनी माहिती देताना मांद्रे मतदार संघात आजही कॉंग्रेस पक्षाला मानणारे जाणकार कार्यकर्त्या बरोबरच युवा पिढीचीही गरज आहे. भाजपची राज्यात सत्ता असल्याने कॉंग्रेस हाच खरा विरोधी पक्ष पुन्हा सत्तास्थानी येण्याचा विश्वास व्यक्त करून त्याची सुरुवात आम्ही मांद्रे मतदार संघातून करुया, असे वक्तव्य केले.

जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांच्याकडे संपर्क साधला असता, मी कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली तर निवडणूक लढवण्यास तयार आहे, यंदाची निवडणूक लढवणारच असा निर्धार शेटगावकर यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.