'या' हट्टापायी काँग्रेस पक्ष फुटला..

गांधी घराण्यातील व्यक्तीलाच पंतप्रधान केले पाहिजे हा अट्टहास का; चर्चिल आलेमाव
'या' हट्टापायी काँग्रेस पक्ष फुटला..
Goa Politics Dainik Gomantak

Goa Politics : चर्चिलचे तळ्यात-मळ्यात

‘गांधी घराण्यातील व्यक्तीलाच पंतप्रधान केले पाहिजे या चुकीच्या हट्टापायी काँग्रेस (Congress) पक्ष फुटला’ असे वक्तव्य करून चर्चिल आलेमाव यांनी आपण मोठा तत्वज्ञानी असल्याचा आव आणला असला तरी काल-परवापर्यंत आपली कन्या वालांका हिला काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी ते धडपडत होते हे गोव्यात सर्वांनाच माहिती आहे.

Goa Politics
देवस्थान मंदिराचे नंबर परस्पर बिगर गोमंतकीय हॉटेल मालकांकडे सुपूर्त.!

आताही चर्चिल आपल्या या ‘लाडली लक्ष्मी’साठीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला ब्लॅकमेल करत असल्याचे सांगितले जाते. आपल्याला बाणावलीत आणि कन्येला नावेलीत उमेदवारी द्या, अन्यथा आपण चाललो तृणमूलमध्ये अशी धमकी देणे त्यांनी सुरू केले आहे. दुसऱ्या बाजूने उमेदवार मिळत नसल्याने तृणमूल काँग्रेसही मेटाकुटीला आली आहे. अन्यथा २०१४ची लोकसभा निवडणूक तृणमूलच्या उमेदवारीवर लढवून भाजपचे नरेंद्र सावईकर यांना निवडून आणण्याचे आपले इस्पित साध्य झाल्यावर तृणमूलला कचऱ्याच्या पेटीत फेकून राष्ट्रवादीशी सोयरीक करणाऱ्या त्‍याच तृणमूलशी पुन्हा संबंध कसे काय जोडू शकते बुवा! ∙∙∙

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com