...आता गोवेकरांच्या हाती येणार “अजब गोव्याचे गजब राजकारण”

आज होणार पुस्तकाचे प्रकाशन
Goa Politics goa political book will be released today

Goa Politics goa political book will be released today

पणजी: गोव्यातील निवडणुकांचा (Goa Politics) आढावा घेणारे पत्रकार संदेश प्रभुदेसाई यांचे “अजीब गोव्याचे गजब राजकारण” हे इंग्रजी पुस्तक सावित्रीबाई फुले यांच्या 181 व्या जयंतीदिनी आज (ता. 3) येथील संस्कृती भवनात संध्याकाळी 4.30 वाजता प्रकाशन होणार आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Politics goa political book will be released today</p></div>
ॲन्थोनी बार्बोजाला भाजपतर्फे उमेदवारीची शक्यता!

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त प्रमुख न्यायाधीश डॉ. फेर्दीन रिबेलो यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. डॉ. रिबेलो हे आणीबाणीनंतर 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीत गोवा विधानसभेचे (Goa Assembly Election) आमदारही होते. पुस्तक प्रकाशनानंतर परिचर्चेचा कार्यक्रम होणार असून यात डॉ. रिबेलो यांच्यासह गोवा विद्यापीठाचे (Goa Election) डॉ. पीटर रोनाल्ड डिसोझा, राजकीय विश्लेशक ॲड क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो, लेखक संदेश प्रभुदेसाई हे भाग घेणार आहेत.

<div class="paragraphs"><p>Goa Politics goa political book will be released today</p></div>
‘सोझा लोबो’ रेस्टॉरंट हल्ला प्रकरणाला स्थानिक पोलिसांचा छुपा पाठिंबा..

पत्रकार किशोर नाईक गावकर हे या परिचर्चेचे सूत्रसंचालन करणार आहेत. गोव्याच्या निवडणुकांचा ऐतिहासिक आढावा घेणारे गोव्यातील हे पहिलेच इंग्रजी पुस्तक आहे. यात 1963 पासून 2017 पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकांबरोबरच ख्रिस्तपूर्व 12000 वर्षांपूर्वी झालेल्या कोंकण किनारपट्टीच्या निर्मितीपासून आजपर्यंतचा इतिहास, भूगोल व संस्कृतीतून गोव्याची अभिनव राजकीय संस्कृती कशी निर्माण झाली याचे विश्लेषण करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com