'भ्रष्टाचारात मुख्यमंत्र्यांएवढाच नगरविकास मंत्र्यांचाही हात'

मुख्यमंत्र्यांबरोबर नगरविकास मंत्र्यांनी सुद्धा पदावरून पायउतार व्हावे, अशी संकल्प आमोणकर यांनी मागणी केली
पत्रकार परिषदेत माहिती देताना गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर व इतर.
पत्रकार परिषदेत माहिती देताना गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर व इतर.Dainik Gomantak

Goa Politics: गोव्याचे माजी राज्यपाल तथा विद्यमान मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Goa Former governor Satyapal Malik) यांनी एका मुलाखतीत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant), आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे (Health MInister Vishwajit Rane) यांनी कोविड-19 महामारीच्या (Covide-19 Epidemic) काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) केला असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. यात जेवढे मुख्यमंत्री आरोपी आहेत तेवढेच नगरविकास मंत्री मिलिंद नाईक (Urban Develop minister Milind Naik) असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर (GPCC VP Sankalp Amonkar) यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर नगरविकास मंत्र्यांनी सुद्धा आपल्या पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी आमोणकर यांनी केली.

कोविड-19 महामारी वेळी टाळे बंदी असताना सुद्धा मुरगाव बंदरातून कोळसा बॉक्साईड या मार्गावरून इतर राज्यातील ट्रक मधून जात होता. संपूर्ण गोव्यात टाळे बंदी असताना मुरगाव बंदर मात्र तेव्हा तेजीत सुरू होते. या विषयी आम्ही आवाज उठवला असताना आमच्यावर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी 27 जुलै 2020 मध्ये राज्यपाल सत्यपाल मलिक यांना मुरगाव बंदरातील टाळेबंदी होणाऱ्या वाहतुकीविषयी निवेदन सादर करून दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक व वास्को पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पण या तक्रारीची आज पर्यंत गृहविभागाने नोंद घेतली नसल्याने येत्या आठ दिवसात वास्को पोलिसांनी संबंधितावर कारवाई केली नाही तर गोवा प्रदेश काँग्रेस समिती पुढील कृती करणार असल्याची चेतावणी काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांनी केली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर व इतर.
गोवा दौऱ्यात राहुल गांधी मच्छिमार बांधवांशी साधणार संवाद भेटणार

वास्को बायणा येथील मुरगाव काँग्रेस गटाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार पत्रकार परिषदेत वरील माहिती गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मुरगाव काँग्रेस गट अध्यक्ष महेश नाईक, उपाध्यक्ष सर्वेश होबळे, सचिन भगत, सॅबी फर्नांडिस उपस्थित होते. पुढे माहिती देताना आमोणकर म्हणाले की मार्च 2020 मध्ये कोविड-19 महामारीमुळे संपूर्ण भारत देशाबरोबर गोव्यात टाळेबंदी घोषित करून सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वताच्या व नगर विकास मंत्र्यांच्या फायद्यासाठी मुरगाव बंदरातील व्यवहार सुरु ठेवला होता. बंदरातून मोठ्या प्रमाणात कोरोना महामारी वेळी कोळसा बॉक्साइड कर्नाटक राज्यात निर्यात करण्यात आला. कोळसा, बॉक्साईट निर्यात करताना परराज्यातील ट्रकांचा उपयोग करण्यात आल्याने गोव्यात पहिला कोविड रुग्ण वास्को मांगोरहिल येथे सापडला. असा खळबळजनक आरोप गोव्याचे माजी राज्यपाल तथा विद्यमान मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला असल्याची माहिती आमोणकर यांनी दिली.

राज्यपालांनी त्यावेळी मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना संपूर्ण गोव्यात टाळेबंदी काटेकोरपणे पाळण्याचे आदेश जारी केले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने गोव्यात करोना विषाणूमुळे चार हजार पेक्षा जास्त नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. याला एवढे जबाबदार मुख्यमंत्री सावंत तेवढेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे आहेत, ज्यांच्यामुळे मुरगाव बंदरातील वाहतूक सुरू करण्यात आली ते नगर विकास मंत्री मिलिंद नाईक असल्याचा आरोप आमोणकर यांनी केला. संपूर्ण वास्को शहर टाळेबंदीत बंद असताना मुरगाव बंदरातून व्यवसाय सुरू होता. कोळसा व बॉक्साईड निर्यात करण्यासाठी परराज्यातील ट्रकाबरोबर त्यांचे चालक असल्याने वास्को प्रथम कोविल रुग्ण आढळला होता. त्यावेळी वास्को, दाबोळी व कुठ्ठाळीच्या आमदारांनी मुरगाव बंदरातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती अशी माहिती आमोणकर यांनी दिली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर व इतर.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू गोव्यात !

मुरगाव बंदरातील वाहतुकीमुळे कोरोना रुग्णात वाढ होणार असल्याने गोवा प्रदेश काँग्रेस समितीने राज्यपाल सत्यपाल मलिक यांना निवेदन सादर केले होते. तसेच निवेदनाची प्रत लावून दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक, वास्को पोलीस संबंधितावर कारवाई करावी म्हणून तक्रार दाखल केली होती. एवढे करून सुद्धा त्या वेळी पोलिसांनी उलट आमच्यावर कारवाई केली होती. येत्या आठ दिवसात आमच्या तक्रारीची दखल राजग्रह विभागाने घेतली नाही तर पुढील कृती करण्यास आम्ही सक्षम असल्याचा इशारा आमोणकर यांनी दिला. राज्य सरकारने कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यावर भ्रष्टाचार करून गोव्याचे नाव बदनाम केले असल्याचे राज्य सरकार त्वरित बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केल्याने हे सिद्ध झाले आहे की महामारीच्या काळात लॉकडाऊनच्या आमच्या मागण्या खऱ्या होत्या; नगरविकास मंत्री मिलिंद नाईक हे एकमेव दोषी असून केवळ त्यांच्या बंदरातील व्यावसायिक हितसंबंधांमुळे लॉकडाऊन झाला नाही आणि यामुळे सरकारला लाज वाटली; नाईक यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना तात्काळ बडतर्फ केले पाहिजे असे आमोणकर म्हणाले.

मिलिंद नाईक यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना तात्काळ बडतर्फ करावे. पोलिसांनी आता राज्यपालांच्या विधानाचा वापर करून 28 जुलै 2020 रोजी दाखल केलेली आमची तक्रार नोंदवावी आणि बंदरातील लोहखनिजाची चोरी आणि नापथा आणि नु शी नलिनी जहाजाचे गैरव्यवहार यासारख्या इतर प्रकरणांमध्ये नाईकचा तपास केला पाहिजे. भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे पंतप्रधानांना पत्र लिहिण्याऐवजी स्थानिक पोलिस ठाण्यात मलिक यांच्या विरोधात तक्रार करू शकतात. गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी शेवटी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com