Goa BJP : महेश आमोणकरांच्या भाजप प्रवेशाने खळबळ

दिगंबर कामत यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास मडगावातील कार्यकर्त्यांच्या एका गटाचा तीव्र विरोध आहे.
Mahesh Amonkar entered in BJP
Mahesh Amonkar entered in BJPDainik Gomantak

Goa BJP : आमदार दिगंबर कामत हे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी अटकळ व्यक्त केली जात असतानाच त्यांचे विरोधक महेश आमोणकर यांना भाजपमध्ये प्रवेश दिला गेल्याने भाजप कार्यकर्ते चक्रावून गेले आहेत. ही चाल शह की काटशह हा प्रश्न त्यांना पडला आहे.

दिगंबर कामत यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास मडगावातील कार्यकर्त्यांच्या एका गटाचा तीव्र विरोध आहे. या गटात खदखद चालू असतानाच आमोणकरांना पक्षात प्रवेश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आमोणकर यांना विचारले असता, मी खरा भाजपचाच कार्यकर्ता. मध्यंतरी मी जरा बाहेर गेलो होतो. माझा भाजप प्रवेश एका अर्थाने घरवापसीच आहे, असे ते म्हणाले. आमोणकर यांना कामत यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे

Mahesh Amonkar entered in BJP
Festival of Goa : राय येथील प्रसिद्ध कणसांचे फेस्त उत्साहात संपन्न

कामत भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले, त्यावेळी आमोणकर हेही काँग्रेसमध्ये सामील झाले. यावेळी पालिका निवडणुकीत कामत यांनी खारेबांध प्रभागात त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांच्यात वितुष्ट आले होते. विधानसभा निवडणुकीत आमोणकर हे तृणमूलच्या उमेदवारीवर कामत यांच्या विरोधात उभे राहिले होते.

दिगंबर कामत भाजपमध्ये आले तर...

काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कामत यांचे प्रयत्न फसल्याने आता ते आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगण्यात येते. मात्र, पुढची पोटनिवडणूक ते स्वतः न लढविता त्यांचे पुत्र योगीराज यांना भाजप उमेदवारीवर मडगावातून उभे करतील. कामत यांना राज्यसभेवर पाठविले जाईल, असे सांगितले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com