Goa Mla Defection: काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले आठपैकी सहाजण आता गॅसवर!

काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या आठजणांपैकी चार महिन्यानंतर दोघांना मंडळांवरील पदे मिळाली. परंतु इतर सहाजणांमध्ये अद्यापि अस्वस्थता कायम आहे.
Goa Mla Defection|goa Politics
Goa Mla Defection|goa PoliticsDainik Gomantak

Goa Politics: काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या आठजणांपैकी चार महिन्यानंतर दोघांना मंडळांवरील पदे मिळाली. परंतु इतर सहाजणांमध्ये अद्यापि अस्वस्थता कायम असून आता आमदार संकल्प आमोणकर सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

आणखी किती दिवस महामंडळे किंवा मंत्रिपदाची वाट पहायची, असा प्रश्‍न या सहाजणांपुढे नक्कीच असणार आहे.

Goa Mla Defection|goa Politics
Mahadayi Water Dispute: सत्य काय ते शेवटी बाहेर आलेच; शहांनीच दिली कबुली

काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्यांमध्ये दिगंबर कामत, मायकल लोबो, केदार नाईक, डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई आणि रुडाल्फ फर्नांडिस यांचा समावेश आहे.

त्यापैकी सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्याची चर्चा असली तरी अद्याप पक्षश्रेष्ठींनी त्यांना हिरवा कंदिल दिलेली नाही. कारण सद्यःस्थितीतील कोणत्या मंत्र्याला वगळायचे यावर अजूनही खल सुरू आहे.

आठजणांना पक्षात घेऊन भाजप मजबूत करण्याबरोबर आपले पदही सुस्थितीत नेण्यात सर्वस्वी मुख्यमंत्री सावंत यांनीच सर्व ती जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे आठजणांच्या मंत्रिपदाच्या किंवा महामंडळ देण्याच्या प्रक्रियेत पक्ष नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे.

त्यामुळे मंत्रिपद किंवा महामंडळ देण्याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्र्यांचाच आहे. तर दुसरीकडे भाजपची सुकाणू समितीही या आठजणांविषयी फारशी आत्मियता दाखवित नाही. इतर सहाजणांना कदाचित सुकाणू समितीच्या बैठकीत मंत्रिपद किंवा महामंडळ देण्याविषयी विरोध होऊ शकतो, हे स्पष्ट आहे.

त्यामुळे इतर सहापैकी इच्छुकांची मदार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे, हे अधोरेखित होत आहे. त्यामुळेच संकल्प आमोणकर आता मुख्यमंत्री सावंत यांना सोमवारी भेटणार असून, त्या भेटीत त्यांच्या काय पदरी पडणार आहे समजेल.

Goa Mla Defection|goa Politics
Goa News: म्हापसा नगराध्यक्षपदी प्रिया मिशाळ ?

मायकल लोबो कात्रीत!

मंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या मायकल लोबो यांना पक्षाने बरोबर कात्रीत पकडले आहे. पक्षाने त्यांच्या पत्नी डिलायला लोबो यांच्याकडे मनोरंजन संस्था दिली आहे, तर त्यांचे समर्थक आमदार केदार नाईक यांना गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले आहे.

त्यामुळे मायकल लोबो यांच्याकडे गप्प बसण्याशिवाय आता पर्याय उरलेला दिसत नाही. ज्येष्ठ नेते दिगंबर कामत काही झाले तरी प्रमोद सावंत यांच्या हाताखालील मंत्रिमंडळात जाण्याची तसूभरही शक्यता दिसत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com