Goa Politics: आगामी निवडणूक "सिंह" निशाणीवर; नरेश सावळ

नरेश सावळ यांनी जाहीर केली आपली भूमिका (Goa Politics)
Goa Politics: आगामी निवडणूक "सिंह" निशाणीवर; नरेश सावळ
Former MLA Naresh Sawal (Goa Politics)Dainik Gomantak

Goa Politics: डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ (Former MLA Naresh Sawal) यांनी अखेर आगामी निवडणुकीतील (Goa Assembly Election 2022) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मगोचे नेते आमदार सुदीन ढवळीकर (MGP MLA Sudin Dhavalikar) यांनी डिचोलीच्या विकासासाठी बरेच योगदान दिले आहे. असे स्पष्ट करीत, डिचोली मतदारसंघातून आगामी निवडणूक आपण मगोच्या "सिंह" निशाणीवर लढणार (MGP Symbol). असे नरेश सावळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान स्पष्ट केले.

Former MLA Naresh Sawal (Goa Politics)
Goa: पारंपारिक घुमटाला पर्याय ?

मगो पक्ष पुनर्जिवीत करण्याची गरज असून, आपण मगो पक्षाशीस राहणार. असे श्री.सावळ म्हणाले. श्री. सावळ यांनी मगोच्या उमेदवारीवर डिचोलीतून मागील विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत अल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ते मगोपासून दुरवाल्याची चर्चाही डिचोलीत सुरु होती. आपण आगामी निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहे. मात्र एखाद्या राजकीय पक्षाच्या उमेदवारीवर, की अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार ते आत्ताच सांगू शकत नाही. असे महिन्यापुर्वी दै. "गोमन्तक" ला दिलेल्या मुलाखती दरम्यान, नरेश सावळ यांनी सांगितले होते. 27 जुलै रोजीच्या "गोमन्तक"मधून त्यांची ही मुलाखत प्रसिद्धही झाली होती. त्यामुळे श्री. सावळ यांच्या भूमिकेकडे डिचोलीतील जनतेचे लक्ष लागून राहिले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com