युतीबाबत काय ते ठरवा, अन्यथा माझा निर्णय घेईन!

बाणावलीचे राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केंद्रीय नेतृत्वाला निर्वाणीचा इशारा दिला.
युतीबाबत काय ते ठरवा, अन्यथा माझा निर्णय घेईन!
NCP MLA Churchill AlemaoDainik Gomantak

मडगाव: काँग्रेसशी (Congress) युती होणार की नाही हे येत्या10 दिवसांत स्पष्ट करा, तसे न झाल्यास मी माझा निर्णय घेण्यास मोकळा आहे, या शब्दात आज बाणावलीचे राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव (NCP MLA Churchill Alemao) यांनी केंद्रीय नेतृत्वाला निर्वाणीचा इशारा दिला. सध्या चर्चिल आलेमाव यांचा तृणमूल (Trinmool) नेत्यांशी संपर्क वाढला आहे, अशा आशयाच्या बातम्या असताना आलेमाव यांनी हा इशारा दिला आहे. त्यामुळे आलेमाव हेही वेगळी चूल मांडणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणीची आज पणजीत बैठक झाली. त्यावेळी आलेमाव यांनी आपली ही भूमिका ठळकपणे मांडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांच्याशी त्यांचा वादही झाला.

NCP MLA Churchill Alemao
बहुजन समाजविरोधी भाजप सरकार;गिरीश चोडणकर

काय म्हणतात जुझे फिलिप डिसोझा

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी भाजपला सत्तेबाहेर ठेवायचे असल्यास मतविभागणी टाळण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची गरज व्यक्त केली. दुसऱ्या पक्षांशी बोलणी करण्यासाठी पाच सदस्यांची समन्वय समिती स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली. युती झाली नाही तरी स्वतंत्ररित्या निवडणूक लढविण्याची आमची क्षमता आहे. मात्र ही युती व्हावी ही आमची इच्छा आहे. त्यासाठी काही काळ गेला तरी हरकत नाही; पण युती झाली पाहिजे. युती झाल्यास राष्ट्रवादीला किमान 8 ते 10 जागा पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

NCP MLA Churchill Alemao
काँग्रेस उमेदवाराची निवड करणार स्थानिक गट समिती

आता माझी सहनशीलता संपली

आता सहनशीलता संपली आहे. दहा दिवसांत आमच्या केंद्रीय नेतृत्वाने याबाबत निर्णय घेतला नाही. लोकांना जो निर्णय हवा तो मी घेईन. त्यानंतर कुणी मला दोष देऊ नये. तृणमूलचे पदाधिकारी तुम्हाला भेटले आहेत काय, असे विचारले असता तृणमूलचेच कशाला मला अन्य पक्षातील लोकही भेटले आहेत. मी लोकांचा उमेदवार आहे. लोकांना जे काय हवे ते मी करणार, असे चर्चिल आलेमाव म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com