'गोंयचो आवाज पक्षा'चे गोमंतकीयांना सतर्क अन् एकत्र राहण्याचे आवाहन

गोव्यात एक नवीन राजकीय सर्कस उलगडतेय
Convenor Capt. Viriato Fernandes Goencho Avaaz
Convenor Capt. Viriato Fernandes Goencho AvaazDainik Gomantak

Goa Politics: गोव्यात एक नवीन राजकीय सर्कस उलगडत असताना, 'गोंयचो आवाज पक्षा'ने (Goencho Avaaz) गोमंतकीयांना सतर्क आणि एकत्र राहण्याचे आवाहन केले आहे. आता जे राजकारणी स्वतःला गोव्याच्या विनाश आणि विध्वंसात मुख्य भागीदार बनवीत आहेत, त्यांच्या पासून सावध राहण्याचा सल्ला पक्षाने दिला आहे.

सध्य परिस्थितीवर भाष्य करताना, गोंयचो आवाज पक्षाचे राज्य संयोजक कॅप्टन विरिएतो फर्नांडिस (Convener Capt. Viriato Fernandes) म्हणाले, की लुईझिन फालेरो यांनी 'आयएनसी'च्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि नावेलीचे आमदार म्हणून अचानक राजीनामा दिला. राजीनामा देण्याचे कारण, "विभाजन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांशी लढण्यासाठी आणि आपल्या राज्याच्या एकीकरणासाठी" असल्याचे सांगून फालेरो यांनी गोमंतकीयांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नये.

Convenor Capt. Viriato Fernandes Goencho Avaaz
'गोव्यात ड्रग्स आणि कॅसिनोचा हैदोस'; सावंत सरकारवर राऊतांचा घणाघात

“आता एक -एक करून मेंढ्यांच्या कळपातील सर्व लांडगे उघड होतील आणि लोकांना गोव्याच्या राजकीय वर्गातील सत्ताधाऱ्यांची अधोगती लक्षात येईल, जे केवळ सत्ता आणि लालसेपोटी राज्य करत आहेत." लुईझिन फालेरो यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा जाहीर करताना सांगितलेली गूढ आणि अस्पष्ट कथा, कुणालाच मूर्ख बनवू शकली नाही. मार्च २०१७ मध्ये काँग्रेसला सरकार स्थापनेचा दावा सादर करण्यासाठी राज्यपालांना पत्र सादर करण्यापासून दिग्विजय सिंह यांनी आपल्याला रोखले, असा संतापजनक दावा फालेरो यांनी केला, त्यावेळी फालेरो काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नव्हते का?

आज, आम्ही त्याना विचारू इच्छितो, की जेव्हा भाजप सरकार प्रादेशिक आराखडा, टीडीआर, १६ ब आणि तीन रेखीय प्रस्थापित प्रकल्प आणून गोवा विकुन नष्ट करत होते, तेव्हा फालेरो यांचा मान कुठे गेला होता? कि त्याना फक्त मोजक्याच गोष्टींवर केलेला अपमान लागतो? त्यांच्या 10 आमदारांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला आणि लोकांच्या जनादेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, तेव्हा त्याचा अपमान कुठे होता? लुईझिन फालेरो यांनी गोव्यातील लोकांसमोर स्पष्ट केले पाहिजे, की त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडताना 10 पक्षभ्रष्ट आमदारांना वचन दिले होते का, की ते योग्य वेळी पक्षाबाहेर सुरक्षित मार्ग काढतील?

आपला दृष्टिकोन सांगताना, गोंयचो आवाज पक्षाचे अध्यक्ष स्वप्नेश शेर्लेकर म्हणाले: '' गोव्याच्या राजकीय वर्तुळात राजकारणाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, जिथे दुर्दैवाने, मातीतील गोंयकर स्वतःच मातृभूमीचा विश्वासघात करत आहेत आणि त्यांच्या स्वार्थासाठी गोवा विकत आहेत. लोकांसाठी हे स्पष्ट आवाहन आहे, की आपण एकत्रितपणे याविरुद्ध लढूया आणि गोवा वाचवू या. टीएमसीने हे समजले पाहिजे, की लोकांच्या हिताच्या दृष्टीने काम न करणारा कोणताच भयंकर राजकीय अजेंडा, त्यांना पुढे नेण्यासाठी गोव्याचा उपयोग प्यादा म्हणून करू देणार नाही. गोवा स्वतःच्या समस्यांची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे.’’

Convenor Capt. Viriato Fernandes Goencho Avaaz
Breaking News: शिवसेना प्रभारी संजय राऊत गोव्यात दाखल

गोंयचो आवाज चे उपाध्यक्ष रोशन मथायस म्हणाले, की “इतिहासाने आपल्याला वारंवार शिकवले आहे, की पोर्तुगीज आणि ब्रिटीशांचा भारतातील प्रवेश, स्थानिकांद्वारेच सुलभ झाला होता. लुईझिन फालेरो याना स्वतःबद्दल हाच वारसा मागे सोडायचा आहे का, की टीएमसीला मदत करुन आपल्याच मातृभूमीच्या विनाशात ते भागीदार व जबाबदार झाले ? या विश्वासघातासाठी गोव्याचे लोक लुईझिन याना कधीही क्षमा करणार नाहीत. ’’

कॅप्टन विरिएतो फर्नांडिस शेवटी म्हणाले, की ''माझ्या सहकारी गोमंतकीयांसाठी माझा एक संदेश आहे. आता एकत्र येण्याची आणि एकत्र राहण्याची वेळ आली आहे. आमचा लाडका गोवा नष्ट करण्याची धमकी देणाऱ्या शक्तींशी आपण एकत्र दोन हात लढू. याआधी एकदा मुक्ती मिळवण्यात गोमंतकीयांना यश आले आहे आणि आम्ही ते पुन्हा करून दाखवू.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com