Goa Politics: गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याने सरकार बरखास्त करा - दिगंबर कामत

मुख्यमंत्री सावंतांच्या नेतृत्वात गोवा "गुन्हेगारांचे स्थळ" बनले (Goa Politics)
Goa Politics: गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याने सरकार बरखास्त करा - दिगंबर कामत
Goa Politics: Digambar Kamat and office bearers (Subhash Faldesai & Joe Dies) speaking at the press conferenceDainik Gomantak

Goa Politics: आज गोव्यात गुन्हेगारी कारवाया (Criminal proceedings Increased in Goa) दिवसेंदिवस वाढत असुन, लोकांच्या मनात भयाचे वातावरण आहे. राज्यात रोजच्या रोज बलात्कार, अपहरण, गॅंग वॉरच्या घटना घडत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गोव्याला "गुन्हेगारांचे स्थळ" बनविले आहे (Place of Criminals). त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नसुन, मुख्यमंत्र्यानी राजीनामा (Demand for resignation of the Chief Minister) देत नसतील तर राज्यपालांनी सरकार त्वरित बरखास्त करावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत (Opposition Leader Digambar Kamat) यांनी केली आहे. दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात (South Goa Congress Office) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर भाजप सरकारवर (Goa BJP Govt) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी कॉंग्रेसचे सरचिटणीस सुभाष फळदेसाई व दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष ज्यो डायस हजर होते.

Goa Politics: Digambar Kamat and office bearers (Subhash Faldesai & Joe Dies) speaking at the press conference
Goa: पत्नीकडून पतीच्या प्रेमसंबंधाचा पर्दाफाश

कळंगुट येथे १२ ऑगस्ट रोजी समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीच्या मृत्युचे कारण शोधण्यास पोलीसांना अद्याप यश आलेले नाही. कालच एका पित्याने आपल्या सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली. फोंडा येथे एका युवतीचे अपहरण करण्याचे प्रयत्न झाले. या घटनांवरुन गुन्हेगारांना पोलीसांचे भय नसल्याचे उघड आहे. आज गुन्हेगांराना गोवा हे सुरक्षित स्थळ वाटत आहे. भाजप सरकारने गोव्यातील गुन्हेगारी कारवायांना आळाबंद आणण्यासाठी काहीच केलेले नाही. भाजपने ड्रग्स माफीया, गुन्हेगार माफीया व भिकारी माफीयांना प्रोत्साहन दिले असुन, त्यामुळेच शांतताप्रेमी गोव्याचे नाव बदनाम झाले आहे.

Goa Politics: Digambar Kamat and office bearers (Subhash Faldesai & Joe Dies) speaking at the press conference
Goa: पुण्यातील पर्यटकाचा लॅपटॉप चोरणाऱ्याला महिनाभरानंतर अटक

दिगंबर कामत यांनी २१ जून २०२० रोजी झालेल्या सांताक्रुझ गॅंग वॉर पासुन कालच समाजमाध्यमांवर झळकलेल्या पोलीस कॉस्टेंबलकडुन आपल्या बायकोला झालेल्या मारहाणीच्या घटनेचा पाढाच वाचला. मागील तीन महिन्यात गोव्यात गुन्हेगारी कारवायांत प्रचंड वाढ झाल्याचे दिगंबर कामत म्हणाले. कळंगुट येथे सापडलेली सिद्धी नाईक हिचा मृतदेह व सदर प्रकरणाचा गुंता सोडविण्यास पोलीसांना आलेले अपयश यावरही दिगंबर कामत यांनी टीका केली. बाणावली येथे दोन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी पालकांना दोष दिला होता. आता उत्तर गोव्यात झालेले संशयास्पद मृत्यू, बलात्कार घटना, अपहरणाचे प्रयत्न यावरुन मुख्यमंत्री कोणाला दोष देतील असा प्रश्न दिगंबर कामत यांनी विचारला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com