‘आप’च्या लोकप्रियतेमुळे भाजपचे धाबे दणाणले : म्हांबरे

आम आदमी पक्षाला मिळणाऱ्या प्रचंड लोकप्रियतेमुळे भाजप हवालदिल झाला आहे.
‘आप’च्या लोकप्रियतेमुळे भाजपचे धाबे दणाणले : म्हांबरे
Goa Politics: आम आदमी पक्षाला मिळणाऱ्या प्रचंड लोकप्रियतेमुळे भाजप हवालदिल झाला आहे. Dainik gomantak

पणजी: आम आदमी पक्षाला मिळणाऱ्या प्रचंड लोकप्रियतेमुळे भाजप हवालदिल झाला आहे (Goa Politics). ‘आप’च्या झंझावातामुळे भाजपच्या बड्या नेत्यांचीही कल्पनाशक्ती कुंठीत झाल्याची टीका ‘आप’चे गोवा निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी केली.

 Goa Politics: आम आदमी पक्षाला मिळणाऱ्या प्रचंड लोकप्रियतेमुळे भाजप हवालदिल झाला आहे.
नागाळीत डोंगरकापणीमुळे लोकं भीतीच्या छायेखाली

गुरुवारी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी ‘आप’वर केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेताना म्हांबरे म्हणाले, केजरीवाल यांनी गोमंतकीयांना दिलेल्या हमीमुळे जनता ‘आप’सोबत आहे. अमित शहा ही वस्तुस्थिती स्वीकारण्यास असमर्थ आहेत. शहा यांनी ‘आप’च्या आश्वासनांची खिल्ली उडवताना ‘मोफत’ हा शब्द वापरला. परंतु इतर राज्यांत अलीकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनीच मोफत वीज, मोफत शिक्षण आणि महिलांसाठी मोफत बस प्रवासाचे आश्वासन दिले होते. केजरीवाल यांनी ३०० युनिट मोफत विजेची हमी दिल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अलीकडेच मोफत पाण्याचे आश्वासन दिले. शहा त्यांच्या जुमल्यांसाठी प्रसिद्ध आहेत. २०१२ पासून गोव्यात भाजप पूर्ण बहुमताने राज्य करत आहे. मात्र, आता त्यांना कल्पना आली असावी.

 Goa Politics: आम आदमी पक्षाला मिळणाऱ्या प्रचंड लोकप्रियतेमुळे भाजप हवालदिल झाला आहे.
Goa: राज्यात इंधन दरवाढीचा भडका, सामान्यांच्या खिशाला झळ

सत्तेचा, लोकनिधीचा गैरवापर

शहा यांनी स्वतःच सांगितले, की सरकारी प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी ही अधिकृत भेट आहे. असे असले तरी या भेटीचा खरा हेतू प्रत्यक्षात २०२२ ची निवडणूक मोहीम होती. यासाठी शेकडो पोलिस आणि सरकारी कर्मचारी आणि यंत्रणा वापरली गेली. प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. कारण पूर्वसूचना न देताच रस्ते बंद केले. सत्तेचा आणि सार्वजनिक निधीचा हा गैरवापर आहे. आगामी निवडणुकीत लोकच त्यांना योग्य उत्तर देतील, असे म्हांबरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com