Goa Politics |Sadanand Tanavade
Goa Politics |Sadanand TanavadeDainik Gomantak

Goa Politics: पराजय झाला तरीही लढण्याची वृत्ती कायम; तानावडे यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक

पंचसदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केलेले तानावडे 2002 च्या विधानसभा निवडणुकीत थिवी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते.

Goa Politics: भाजपचे ज्येष्ठ नेते सदानंद शेट-तानावडे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, त्या घटनेस गुरुवारी 12 रोजी तीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांचा भाजपच्या कार्यालयात पक्षाच्या नेत्यांनी सत्कार करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याशिवाय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही त्यांचे विशेष कौतुक केले.

पंचसदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केलेले तानावडे 2002 च्या विधानसभा निवडणुकीत थिवी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते.

2007 मध्ये पुन्हा विधानसभेत जाण्याची त्यांची संधी थोडक्यात हुकली. पराजय झाला तरीही त्यांची लढण्याची वृत्ती कायम राहिली. त्यांनी समाजकारण आणि राजकारण सुरूच ठेवले, तसेच पक्षाशी एकनिष्ठ राहून भाजपमध्ये सक्रिय राहिले.

Goa Politics |Sadanand Tanavade
Mahadayi Water Dispute: '..तर राज्यातील चाळीसही आमदारांनी घरी बसावे'

न भूतो’ असे यश

तीन वर्षांच्या कारकीर्दीत राज्यात ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा अशा सार्वजनिक निवडणुका झाल्या. काही पोटनिवडणुकाही झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने बहुतांश सर्व निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळविले. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तर पक्षाला ‘न भूतो’ असे यश मिळवून दिले.

Goa Politics |Sadanand Tanavade
Baga: बागा येथे वाहनतळावर उतरले हेलिकॉप्टर !

विविध पदांवर केले काम

राज्यात पक्षातील विविध पदांवर त्यांनी काम केले. प्रत्येकवेळी प्रत्येक पदाला त्यांनी योग्य तो न्याय दिला. 2020मध्ये केंद्रीय नेत्यांनी त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती आनंदाने स्वीकारली. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडताना त्यांनी पक्षात अनेक बदल घडविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com