भाजप व कॉंग्रेसमधील फरक दाखवत कॉंग्रेसवर साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात गरिबासाठीच्या योजनांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जातात . हाच भाजप (BJP) व कॉंग्रेसमधील फरक आहे;पंचायत व वाहतूक मंत्री माविन गुदीन्हो
भाजप व कॉंग्रेसमधील फरक दाखवत कॉंग्रेसवर साधला निशाणा
Goa Politics : पंचायत व वाहतूक मंत्री माविन गुदीन्हो (Transport Minister Mauvin Gudinho) Dainik Gomantak

पणजी :कॉंग्रेसच्या (Congress) काळात मिडलमन कमिशन खात होते. आणि त्यामुळे गरिबासाठी मंजूर होणारे पैसे गरिबांना अर्ध्यापेक्षा कमी पोचत होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात गरिबासाठीच्या योजनांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जातात . हाच भाजप (BJP) व कॉंग्रेसमधील फरक आहे. असे प्रतिपादन पंचायत व वाहतूक मंत्री माविन गुदीन्हो (Transport Minister Mauvin Gudinho) यांनी केले आहे.

Goa Politics  : पंचायत व वाहतूक मंत्री माविन गुदीन्हो (Transport Minister Mauvin Gudinho)
Goa: असंघटीत कामगारांना मोठा दिलासा

गुदीन्हो यांची पुन्हा एकदा राष्ट्रिय जीएसटी मंडळावर नियुक्ती झाली आहे. या पार्श्‍वभुमीवर एका वृत्तवाहनीशी बोलताना गुदीन्हो यांनी वरील प्रतिपादन केले. भारतीय जनता पक्षाच्या केंद्र व राज्य सरकारने गरिब लोकांसाठी अनेक योजना राबवल्या व त्यांची अंमलबजावनी केली. कॉंग्रेसने फक्त भ्रष्टाचार केला. देशात विकास प्रकल्प उभे होत आहेत. सर्वच क्षेत्रात प्रगती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुरदृष्टीमुळेच हे शक्य झाल्याचे सांगून येत्या काळातही असाच विकास होणार असल्याचे गुदीन्हो म्हणाले.

Goa Politics  : पंचायत व वाहतूक मंत्री माविन गुदीन्हो (Transport Minister Mauvin Gudinho)
Goa: उ.मा. विद्यालयातील 11 वी 12 वीच्या परिक्षा ऑफलाईन पद्धतीने

पेट्रोल व डिझेलवर सरकार कमवत नाही !

पेट्रोल व डिझेल दिवसेंदिवस महाग होत आहे. मात्र केंद्र सरकार या वस्तूवर कमावत नाही. वरील दोन्ही गोष्टी महाग झाल्याने जिवनावश्‍यक वस्तूचे दर वाढतात याची जाणीव सरकारला आहे. आणि त्यामुळेच जिवनावश्‍यक वस्तूंचे युक्तीकरण करण्याची मोठी जबाबदारी आपला समावेश असलेल्या जीएसटी मंडळावर असून जिवनावश्‍यक वस्तू स्वस्त व्हाव्यात यासाठी विविध उपाय योजले जाणार असल्याचे गुदीन्हो यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.