Goa Society: फोंडातील VPK अर्बन शाखेचे स्थलांतर

Goa Society: फोंडा येथील फोन्सेका इमारतीत उद्‌घाटनाचा सोहळा होणार आहे.
Goa Society | VPK Urban Co-operative Credit Society
Goa Society | VPK Urban Co-operative Credit SocietyDainik Gomantak

Goa Society: व्हीपीके अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या फोंडा शाखेचे सोमवारी 10 ऑक्‍टोबरला स्थलांतर करण्यात येणार आहे. तिस्क-सदर, फोंडा येथील फोन्सेका इमारतीत हा उद्‌घाटनाचा सोहळा संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. (VPK Urban Co-operative Credit Society)

दरम्यान, यावेळी सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक, कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, फोंडा नगराध्यक्ष रितेश नाईक, सहकार निबंधक विशांत गावणेकर, व्हीपीके अर्बनचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, उपाध्यक्ष सूर्यकांत गावडे, संचालक आनंद केरकर, रामा ऊर्फ सूर्या गावडे, हिरू खेडेकर, दिना बांदोडकर, रोहिदास गावडे, हेमंत गावडे, चिराग गावडे, सावित्री वेलिंगकर व सुषमा गावडे यांची उपस्थिती असेल.

Goa Society | VPK Urban Co-operative Credit Society
Goa Crime: ग्रॅनाईट व्यावसायिकाला दगडाने मारहाण करणारे चौघांना अटक

तसेच, या स्थलांतर कार्यक्रमानिमित्त नूतन वास्तूत सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद होणार आहे. भाविक व हितचिंतकांनी उपस्‍थिती लावावी, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

भागभांडवल 33 कोटी 8 लाख रुपये

व्हीपीके अर्बन ही गोव्यातील एक नामांकित अर्बन बँक असून 31 मार्च 2022 रोजीच्या अहवालानुसार व्हीपीकेचे भागभांडवल 33 कोटी 8 लाख रुपये एवढे आहे. राखीव निधी 28 कोटी 65 लाख रुपये आहे. भागधारकांच्या ठेवी 528 कोटी 74 लाखांच्‍या असून कर्जस्वरुपात 402 कोटी 82 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

Goa Society | VPK Urban Co-operative Credit Society
Zilla Panchayat Election: दवर्लीतून अपक्षाची माघार; एकूण 15 उमेदवार रिंगणात

व्हीपीके अर्बनची गुंतवणूक 242 कोटी 45 लाख रुपये असून 1 लाख 11 हजार 793 भागधारक आहेत. व्हीपीकेमध्ये 240 कर्मचारी काम करीत आहेत. गोव्यात सोसायटीच्‍या 37 शाखा कार्यरत आहेत. विद्यमान संचालक मंडळाने व्हीपीके अर्बनच्या उत्कर्षासाठी विविध निर्णय घेतले असून त्याची सध्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com