Goa Crime: महागडे शौक पूर्ण करण्‍यासाठी ‘ते’ दोघे करायचे चोऱ्यामाऱ्या

Goa Crime: फोंडा चोरीसत्र : 24 तासांत मुसक्या आवळल्या
Goa Crime News | Goa News
Goa Crime News | Goa News Dainik Gomantak

Goa Crime: चोऱ्या करण्यासाठी या दोघांनी फोंड्यात आधी टेहळणी केली होती. कुठला फ्लॅट बंद आहे, वगैरे माहिती घेतल्यानंतरच त्यांनी दिवसाढवळ्या या चोऱ्या केल्या होत्या. या दोघांनी आणखी कुठे डल्ला मारला आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.

फोंडा शहरातील तीन ठिकाणच्या घरफोडी प्रकरणांत दोघा चोरांच्या मुसक्या 24 तासांत आवळण्यात फोंडा पोलिसांना यश आले. महागडे शौक पूर्ण करण्‍यासाठी ते चोऱ्या करायचे, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

हे दोन्ही संशयित महाराष्ट्रातील असून एकाचे नाव दयानंद रवी शेट्टी (वय 37) असे असून तो सायन-मुंबई येथील रहिवासी आहे, तर दुसरा चोर संजय हनुमंत जमादार हा उमर्गा-उस्मानाबाद येथील रहिवासी आहे. अंत्रुजनगर हाऊसिंग सोसायटीतील विठ्ठल प्रभू यांच्या फ्लॅटमधील कपाट फोडून चार लाखांचे दागिने तसेच दीड लाख रुपयांची रोकड त्यांनी पळवली होती.

दुसऱ्या एका घटनेत त्याच दिवशी झिंगडीमळ-कुर्टी येथील विराज पाटील यांच्या फ्लॅटमध्ये चोरी करून पाच लाख रुपयांचे दागिने व पाच हजार रुपयांची रोकड, तर तिसऱ्या घटनेत झिंगडीमळ-कुर्टीतीलच पुंडलिक गावडे यांच्या फ्लॅटमध्ये चोरी करून दीड हजार रुपयांची रोकड त्यांनी लंपास केली होती.

फोंडा पोलिस स्थानकात यासंबंधीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर तसेच उपनिरीक्षक परेश सिनारी, हेड कॉन्स्टेबल केदारनाथ जल्मी, कॉन्स्टेबल अमय गोसावी, आदित्य नाईक, मयूर जांबोटकर आणि ओंकार सावंत यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

Goa Crime News | Goa News
Goa Crime Case: ओळखीच्या व्यक्तींकडूनच घात? गोव्यातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचं 'हे' उत्तर

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उलगडा

चोरी झालेल्या ठिकाणचे तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले, तसेच काहीजणांकडे चौकशीही केली. त्यात दोन्ही चोर पणजीच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले.

त्यानुसार पोलिसांनी संशयित दयानंद रवी शेट्टी आणि संजय हनुमंत जमादार या दोघांना पणजीतील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले.

मुद्देमाल जप्त

या चोरांकडून दहा लाख रुपयांचे दागिने तसेच सहा हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. दयानंद शेट्टी हा सायन- मुंबईतील रहिवासी असून तो चित्रपट तसेच मालिकांसाठी स्पॉटबॉय म्हणून काम करायचा, तर संजय जमादार हा उमर्गा येथे वडापावचा गाडा चालवतो.

दोघेही मित्र असून त्यांनी गोव्यात येऊन चोरीचा डाव आखला होता. दोघांनाही अनेक महागडे शौक तसेच छानछौकीत राहण्याची हौस होती. ती पूर्ण करण्यासाठी ते चोऱ्या करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

चोरीपूर्वी टेहळणी

चोऱ्या करण्यासाठी या दोघांनी फोंड्यात आधी टेहळणी केली होती. कुठला फ्लॅट बंद आहे, वगैरे माहिती घेतल्यानंतरच त्यांनी दिवसाढवळ्या या चोऱ्या केल्या होत्या. या दोघांनी आणखी कुठे डल्ला मारला आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com