Goa Latest News: गोवा डेअरीचे दूध पुन्हा महागणार; ग्राहकांना झटका

Goa Latest News: पुरवठादारांची दहा कोटींची बिले थकली
Rajesh Phaldesai |Goa News
Rajesh Phaldesai |Goa News Dainik Gomantak

Rajesh Phaldesai: गोवा डेअरीच्या पशुखाद्य प्रकल्पाला कच्चा माल पुरवणाऱ्यांची सुमारे दहा कोटींची बिले अदा न केल्याने त्यांनी कच्चा माल पुरवण्यास नकार दिल्यामुळे प्रकल्प 12 दिवस बंद ठेवावा लागला होता. आता हा प्रकल्प कसाबसा सुरू केला आहे. पण तो कितपत चालेल, ही शंकाच आहे, असे गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी पत्रकारांना सांगितले. तथापि, गोवा डेअरीच्या दूध दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केल्याने दूध पुन्हा एकदा महागणार आहे.

हल्लीच काही दिवसांपूर्वी गोवा डेअरीच्या दुधाचे दर वाढवले होते. आता ही दुसऱ्यांना वाढ केल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे. पशुखाद्य प्रकल्पाला कच्चा माल पुरवणाऱ्यांची दहा कोटींची बिले वेळीच अदा केली असती तर आता प्रकल्प बंद ठेवण्याची नामुष्की आली नसती.

नवीन संचालक मंडळ कार्यरत होण्याअगोदरच या कच्च्या मालासंबंधीचे व्यवहार झाले होते. त्यामुळे आता ते पैसे अदा करावे लागणार आहेत. एक वर्षापासून ही बिले थकली आहेत. या प्रकाराला यापूर्वीचे प्रशासक मंडळच जबाबदार असल्याचा आरोपही राजेश फळदेसाई यांनी केला आहे.

दहा कर्मचाऱ्यांना केले कमी!

डेअरीत रोजंदारीवरील दहा कामगारांना सध्या कमी केले आहे. प्रशासकांच्या काळात गोवा डेअरीत 32 कर्मचाऱ्यांची खोगीरभरती झाली होती. खास मर्जीतील लोकांना डेअरीत नोकरी दिली होती. त्यातील दहा कामगारांना कमी केले असून 15 जणांना सेवेत कायम केले, त्यांचीही चौकशी सध्या सुरू असल्याचे राजेश फळदेसाई यांनी सांगितले.

डेअरीच्या कर्मचाऱ्यांकडून वसुली

या घोटाळ्यासंबंधी राजेश फळदेसाई यांना विचारले असता, या कंत्राटदाराकडून हे साठ लाख रुपये वसूल करण्यासाठी तगादा लावला आहे. शिवाय कंत्राटदाराच्या गाडीवर सध्या डेअरीचे कर्मचारी पैसे गोळा करण्यासाठी पाठवली जात आहेत. त्यामुळे सध्या तरी देय रकमेत वाढ झालेली नाही. तरीही दूध उत्पादकांच्या पैशांवर डल्ला मारायला लोकांना संधी दिलीच कशी, असा सवालही विद्यमान संचालक मंडळाकडून केला जात आहे.

Rajesh Phaldesai |Goa News
Molesting In Siolim: शिवोली येथे 13 वर्षीय मुलीचा विनयभंग, पश्चिम बंगालच्या व्यक्तीला अटक

60 लाखांचा घपला

एका कंत्राटदाराकडून तर तब्बल साठ लाख रुपये येणे बाकी आहेत. मार्केटमधून दूध विक्रीचे पैसे गोळा केल्यानंतर ते लगेच कंत्राटदाराने बँकेत भरती करणे आवश्‍यक आहे, पण कंत्राटदाराने बराच काळ गोळा केलेले पैसे भरलेच नाहीत. त्यामुळे ही रक्कम आता साठ लाखांवर पोचली आहे, असे अध्यक्ष राजेश फळदेसाई म्हणाले.

दोन रुपये दरवाढ

गोवा डेअरी सध्या नुकसानीत आहे. उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने अखेर गोवा डेअरीच्या दूध दरात वाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे नव्या संचालक मंडळाचे मत आहे. नवीन वर्षापासून प्रती लिटर दोन रुपये वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे डेअरीच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही संचालक मंडळाचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com