Ponda Municipality News: रितेश नाईक यांच्याविरुद्ध फोंडाच्या नगरसेवकाचा अविश्‍वास

Ponda Municipality News: फोंडा पालिकेचे आठजणांनी हा अविश्‍वास ठराव आणला आहे.
Ponda Municipality | Goa News
Ponda Municipality | Goa NewsDainik Gomantak

Ritesh Naik: फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्यावर आठ नगरसेवकांनी अविश्‍वास ठराव दाखल केला असून पालिकेचा कार्यकाळ केवळ पाच महिन्यांचा शिल्लक असताना हा अविश्‍वास ठराव दाखल करण्यात आला आहे.

या अविश्‍वास ठरावावर नगरसेवक व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक, शांताराम कोलवेकर, प्रदीप नाईक, विलियम आगियार, गिताली तळावलीकर, अमिना नाईक, सीमा फर्नांडिस व जया सावंत यांच्या सह्या आहेत.

फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षांवर विश्‍वास राहिला नसल्यानेच हा अविश्‍वास ठराव आणल्याचे ठरावात नमूद करण्यात आले असून लवकरात लवकर यासंबंधी बैठक घ्या अशी मागणी या आठही नगरसेवकांनी केली आहे. फोंडा पालिकेचे नगरसेवक मंडळ पंधरा सदस्यीय असून त्यातील आठजणांनी हा अविश्‍वास ठराव आणला आहे.

साडेचार वर्षांत पाच नगराध्यक्ष

फोंडा पालिकेने गेल्या साडेचार वर्षांत पाच नगराध्यक्ष पाहिले. विद्यमान नगराध्यक्ष रितेश नाईक हे पाचवे नगराध्यक्ष ठरले आहेत. पालिका मंडळाच्या निवडणुकीत मगो पक्ष प्रणित रायझिंग फोंडा बॅनरच्या नावाखाली सुरवातीला प्रदीप नाईक हे 21 मे 2018 रोजी नगराध्यक्ष म्हणून निवडून आले.

Ponda Municipality | Goa News
Goa Fire News: बार्देशमध्ये अग्नितांडव! घराला भीषण आग; सुमारे दोन लाखांचे नुकसान...

त्यानंतर भाजपप्रणित व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक हे 29 ऑगस्ट 2019 रोजी नगराध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यानंतर भाजपचेच विश्‍वनाथ ऊर्फ अपूर दळवी यांनी 31 ऑगस्ट 2020 रोजी नगराध्यक्षपदाचा ताबा घेतला.

शांताराम कोलवेकर यांची 18 मे 2021 रोजी नगराध्यक्षपदी निवड झाली, तर पाचवे नगराध्यक्ष म्हणून रितेश नाईक यांची 13 एप्रिल 2022 रोजी निवड झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com