Sudin Dhavalikar: सुसंस्कृत, सुदृढ समाजाची निर्मिती हवी!

Sudin Dhavalikar: केरी ब्राह्मण महिला मेळावा ठरला रंगतदार
Sudin Dhavalikar | Goa News
Sudin Dhavalikar | Goa News Dainik Gomantak

Sudin Dhavalikar: समाज सुसंस्कृत आणि सुदृढ होण्यासाठी आणि संघटीतरीत्या कार्य करण्यासाठी एकजूट ही महत्त्वाची असून पैशांअभावी कुणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये याची खबरदारी घेण्याची आज गरज आहे, असे मगो पक्षाचे नेते तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

केरी - फोंड्यातील विजयादुर्गा संस्थानच्या कल्याण मंडपात आज (रविवारी) ब्राह्मण महिला मेळावा 2022 चे आयोजन द्रविड ब्राह्मण संघ व ब्राह्मण महासंघातर्फे संयुक्तरीत्या करण्यात आले होते. या मेळाव्याचे शानदार उद्‌घाटन केल्यानंतर सुदिन ढवळीकर बोलत होते.

ढवळकीर पुढे म्हणाले, आरोग्याच्याबाबतीतही तोच प्रकार असून कुणाच्या आरोग्याची हेळसांड जर होत असेल तर समाजाबरोबरच इतर कमकुवत घटकांना सहाय्य करण्यासाठी समाजातील लोकांनी पुढे यावे.

या मेळाव्याला निवेदिका मंगला खाडिलकर, द्रविड ब्राह्मण संघाचे अध्यक्ष दिलीप ढवळीकर, ब्राह्मणमहासंघाचे अध्यक्ष गुरुदास मोने तसेच मेळाव्याच्या स्वागताध्यक्षा प्रतिभा संदीप निगळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

सुदिन ढवळीकर म्हणाले, एकमेकांच्या सहकार्यानेच समृद्ध राज्य आणि देशाची संकल्पना ही दृढ होऊ शकते म्हणूनच आज या मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, असे उद्‌गार काढून त्यांनी समाधान व्यक्त केले. मेळाव्याला उपस्थित सर्व महिलांचे त्यांनी स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.

Sudin Dhavalikar | Goa News
Goa News: मुलाने चीडचीड केली तरी वडिलांना भेटण्याचा अधिकार

या मेळाव्यात समाजासाठी कार्यरत राहिलेल्या आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात अनुराधा मोघे, विभावरी उमर्ये, डॉ. सुशीला सावईकर, इला प्रभुगावकर, पार्वती प्रभू व जानकी कोरडे यांचा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर समाजातील होतकरू युवतींनाही सन्मानित करण्यात आले. त्यात भक्ती कुलकर्णी, श्रुती देवारी, गौरी ढवळीकर, कल्याणी हर्डिकर यांचा समावेश होता.

सुरेल अशा स्वागतगीताने तसेच दिंडी मिरवणुकीने कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. स्वागत प्रतिभा निगळ्ये यांनी केले. प्रास्ताविक गुरुदास मोने यांनी तर सूत्रसंचालन विद्या घैसास व दिलीप ढवळीकर यांनी आभार मानले.

कौटुंबिकतेची झालर!

राज्यभरातील ब्राह्मण महिलांचा हा मेळावा असला तरी त्याला कौटुंबिकतेची झालर होती. त्यामुळे मेळावा रंगतदार ठरला. राज्यभरातून महिला या मेळाव्याला उपस्थित होत्या. एकाच सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित महिलांमुळे त्यांच्यात कौटुंबिक वातावरण निर्माण झाले. या मेळाव्याला कौटुंबिक वातावरण लाभल्याने महिलांनी दिवसभर या मेळाव्यात आनंद लुटला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com