Goa: फोंड्यात भाजपला खिंडार; विद्यमान नगरसेवकांचा 'मगो' त प्रवेश

कुडचडे भाजपच्या (BJP) माजी नगरसेवकासह विद्यमान दोन नगरसेवकांचा मगो पक्षात प्रवेश.
Goa: फोंड्यात भाजपला खिंडार; विद्यमान नगरसेवकांचा 'मगो' त प्रवेश
Maharashtrawadi Gomantak Party & BJPDainik Gomantak

फोंडा: कुडचडे भाजपच्या माजी नगरसेवकासह विद्यमान दोन नगरसेवकांचा मगो पक्षात प्रवेश. मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांनी दिला फोड्यात प्रवेश कुडचडे नगरसेवकांचा मगो प्रवेश. कुडचडे काकोडा पालिकेचे माजी नगरसेवक आनंद ऊर्फ विठोबा प्रभुदेसाई विद्यमान नगरसेवक अपर्णा प्रभुदेसाई तसेच मंगलदास घाडी यांनी हा प्रवेश केला आहे.

मंगलदास घाडी यांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली नसली तरी मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी घाडी यांनी मगोत प्रवेश केल्याचे जाहीर केले दरम्यान आनंद प्रभुदेसाई यांनी भाजपमधे सध्या अंदाधुंदी सुरु असून कार्य कार्यकर्त्याना वापरून फेकले जात असल्याचा आरोप केला. कुडचडे मतदार संघात विद्यमान आमदाराची दादागिरी सुरु असून यावेळ ला बदल नक्की असल्याचे नमूद केले. अन्य समर्थकांनी या वेळी मगो पक्षात प्रवेश केला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com