Goa: ‘बीएस्सी’ अॅनालिटिकल केमेस्ट्रीत पूजा मेळेकर अव्वल

pooja  1.jpg
pooja 1.jpg

गुळेली: मेळावली सत्तरी (Satari) येथील पूजा उमेश मेळेकर (Pooja Umesh Melekar) हिने पीईएस श्री रवी सीताराम नाईक (Ravi Sitaram Naik) महाविद्यालय फर्मागुडी - फोंडा (Fonda) या महाविद्यालयात शिक्षण घेऊन बीएस्सीत अॅनालिटिकल केमेस्ट्रीमध्ये (Analytical Chemistry) पहिली येण्याचा मान मिळवला आहे. मेळावली आयआयटी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या पूजाशी केलेली ही बातचीत... 

प्रश्र्न : पूजा तू या परीक्षेत पहिली येणार अशी तुला आशा होती का? 
पूजा : मी पहिली येणार असं मला वाटलं नव्हतं. मी माझ्या दररोजच्या सवयीप्रमाणे माझा अभ्यास करत होते. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं केलं, यामुळे हे यश मला मिळाले, असे मी म्हणेन.  (Goa Pooja Melekar tops in BSc Analytical Chemistry)

प्रश्र्न : एकूण ‘आयआयटी’ आंदोलन आणि तुझा हा अभ्यास यांचा मेळ कसा घातला? 
पूजा : ‘आयआयटी’ आंदोलन म्हणजे आमच्या संपूर्ण मेळावली भागातील लोकांचा जीवन - मरणाचा प्रश्न होता. तसेच अभ्यास हा माझा प्रश्न होता. संपूर्ण दिवस आंदोलनकर्त्यांबरोबर रस्त्यावर बसत होते. गाव वाचवण्यासाठी आणि रात्र जागवून घरी अभ्यास करीत होते स्वत: साठी. आम्ही सर्वांच्या सहकार्याने ‘आयआयटी’ आंदोलन जिंकलो, तो आनंद आहेच आणि स्वत:च्या हिमतीवर अभ्यासाची लढाईसुद्धा जिंकली याचा अभिमान आहे. 

प्रश्र्न : या तुझ्या यशाचे श्रेय कुणाला देते? 
पूजा : माझ्या या यशाचे पूर्ण श्रेय माझ्या कुटुंबाला देते. वडिलांचे छत्र हरवल्यापासून आमचा सांभाळ महेश मेळेकर (काका) यांनी केला. त्‍यांनी वेळप्रसंगी बाजारात सामान विकून आमचे संगोपन केले. आम्हाला काहीच कमी न पडू देणारी माझी आई, तसेच वेळोवेळी मदत करणाऱ्या माझ्या दोन बहिणी. तसेच कॉलेजमधील माझे सर्व अध्यापक, प्राचार्य यांना श्रेय देते. प्राथमिक शिक्षण धडा मेळावली सरकारी प्राथमिक विद्यालय, सरकारी माध्यमिक विद्यालय गुळेली, सर्वोदय उच्च माध्यमिक विद्यालय उसगाव या ठिकाणी मला मला सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले, त्‍याबद्दल मी ऋणी आहे. 

प्रश्न : कोरोना काळात धडा मेळावली यासारख्या भागात मोबाईल नेटवर्कची समस्‍या आहे, तू कशा प्रकारे शिक्षण घेतलं? 
पूजा : ज्या ठिकाणी आमच्या गावात नेटवर्क मिळते अशा ठिकाणी जंगलात जाऊन माझे महामारीच्या काळात शिक्षण पूर्ण केले. सरकारला माझे एकच सांगणे की, ऑनलाईन शिक्षण त्यांनी शिक्षण सुरू केले. परंतु, आमच्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करावा. नेटवर्क उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे. 

प्रश्न : ग्रामीण विद्यार्थी वर्गाला तुझं काय सागणं आहे? 
पूजा : आम्ही ग्रामीण भागातील आहे, असं स्वत:ला समजू नका. आम्हीसुद्धा व्यवस्थित अभ्यास केला, तर यश संपादन करू शकतो, हे इतरांना दाखवून द्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com