Goa: मजूर वीज खांबावरून पडल्यास जबाबदार कोण ?

संरक्षक साधनांशिवाय मजुरांना उंच वीज खांबावर चढवून वीज वाहिन्या टाकण्याच्या प्रकारावर बार्देश शिवसेना प्रमुख विन्सेंट परैरा यांचा तीव्र संताप
Goa: मजूर वीज खांबावरून पडल्यास जबाबदार कोण ?
कुठल्याही संरक्षक साधनाशिवाय पंन्नास फुट उंचावरील वीज खांबावर अनवाणी लटकणारे कंत्राटी मजूरDainik Gomantak

Goa: अनवाणी तसेच कुठल्याही संरक्षक साधनांशिवाय कंत्राटदार मजुरांना पन्नास फुट उंचीच्या वीज खांबावर चढवून वीज वाहिन्या टाकण्याचा अजब प्रकार बुधवारी दिवसभर मार्ना - शिवोलीत घडला. दरम्यान, शिवोली पंचायत मंडळाच्या नाकावर टिच्चून घडलेल्या या प्रकाराबाबतीत बार्देश शिवसेना प्रमुख विन्सेंट परैरा (Shivsena Leader Vincent Pereira) यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी परैरा यांनी केली आहे.

कुठल्याही संरक्षक साधनाशिवाय पंन्नास फुट उंचावरील वीज खांबावर अनवाणी लटकणारे कंत्राटी मजूर
जनमन उत्सवाला उत्तर गोव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

बुधवारी सकाळी दहा वाजता येथील सेंट एन्थॉनी चर्च परिसरात नवीन वीज वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते, यावेळी स्थानिक वीज केद्राचे कर्मचारी तसेच अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते, मात्र सर्वाच्या डोळ्यांदेखत होत असलेल्या या प्रकराची साधी दखल सुद्धा घेण्याची तसदी स्थानिक पंचायत मंडळाकडून घेतली गेली नाही.

कुठल्याही संरक्षक साधनाशिवाय पंन्नास फुट उंचावरील वीज खांबावर अनवाणी लटकणारे कंत्राटी मजूर
Goa Election: तृणमूल काँग्रेसच्या गोव्यात हालचाली

दै. गोमंतकच्या स्थानिक प्रतिनिधींनी याबाबतीत चौकशी केली असतां आपल्याला वीज पुरवठा पाहिजे असल्यास मुकाट्याने हे सहन करा अन्यथा अंधारातून जावा, असे तावातावाने एका कर्मचार्याने सुनावले. मजुरांचे काय, एखादा पडून मेलाच तर लाखभर रुपये देउन प्रकरण मिटवता येते त्यांना सुरक्षेच्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मार्ना शिवोली पंचायतीचे हंगामी सरपंच विलीयम फर्नांडिस यांच्याशी याबाबतीत विचारणा केली असतां पंचायत मंडळ याबाबतीत अनभिज्ञ असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.