"मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतप्रमाणेच वीजमंत्री काब्राल खोटारडे"

दैनिक गोमन्तक
शनिवार, 2 जानेवारी 2021

वीज दरवाढ होणे अपरिहार्य आहे,या ऊर्जामंत्री निलेश काब्राल यांच्या विधानाचा आम आदमी पक्षाने तीव्र शब्दात निषेध केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पणजी: वीज दरवाढ होणे अपरिहार्य आहे,या ऊर्जामंत्री निलेश काब्राल यांच्या विधानाचा आम आदमी पक्षाने तीव्र शब्दात निषेध केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. खरं म्हणजे वीज दर कमी करता येईल, असे म्हणणारे काब्राल हे त्यांचे नेते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याप्रमाणेच आणखी एक खोटारडे निघाले,अशी टीका आपचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी केली. 
म्हांबरे यांनी वीज दर वाढवण्याची गरज नाही असे प्रतिपादन केले आणि दर वाढ हाच एकच उपाय आहे,असे काब्राल यांना वाटत असेल तर त्यांनी ऊर्जामंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले.

दिल्लीतील आप सरकार घरगुती वापरासाठी मोफत वीज व अनुदानित वीज पुरवते आहे, याकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की गोव्यामध्येही हे  शक्य आहे आणि याचा आरंभ करण्याकरिता  काब्राल यांना काही महिन्यांकरिता 'आप'कडे वीज विभागाचा पदभार सोपवावा. 

"गोव्यातील दरडोई खर्चांपैकी सर्वात जास्त खर्चिक झाल्यानंतरही वीज दरवाढ बरीच वेगाने वाढत आहे. गोमंतकीयांच्या संघटित लूटीशिवाय हे दूसरे काही नाही. कोविडने ज्या आर्थिक संकटात आम्हाला ढकलले होते, त्यातून गोमंतकीयांनी नुकतेच सावरण्यास सुरवात केली आहे. दुर्दैवाने, सरकार गोमंतकीयांसाठी गोष्टी सुलभ करण्याच्या प्रयत्नाऐवजी केवळ अशा निर्णयामुळे त्यांच्यावर अधिकच ताण आणत आहे. 

“आम्ही यापूर्वीही म्हटले आहे की, गोव्यातील सरकार स्थापनेनंतर ४८ तासांच्या आत आप दरमहा २०० युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज पुरवेल आणि दरमहा २०१ ते ४०० युनिट वीज वापरणाऱ्यांना ५० टक्के अनुदान देईल. ," ते म्हणाले.

आणखी वाचा:

नगरपालिका दुरुस्ती गोमंतकीयांना व्यवसायांपासून वंचित ठेवेलः डिमेलो -

संबंधित बातम्या