एनडीएतून सोडलेली रॉकेटस भेदण्याचे काॅंग्रेसकडे सामर्थ्य; सरदेसाई यांना चोडणकरांचे प्रत्युत्तर

दैनिक गोमन्तक
रविवार, 14 मार्च 2021

कॉंग्रेस पक्षाने आजपर्यंत अनेक युद्धांचा यशस्वीपणे सामना केला असून प्रत्येक वेळी विजय संपादन केला आहे. भाजपच्या नियंत्रणाखाली एनडीएतून आलेली रॉकेट्स भेदून नष्ट करण्याचे सामर्थ्य गोव्यातील कॉंग्रेस पक्षात आहे असे गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

मडगाव  - कॉंग्रेस पक्षाने आजपर्यंत अनेक युद्धांचा यशस्वीपणे सामना केला असून प्रत्येक वेळी विजय संपादन केला आहे. भाजपच्या नियंत्रणाखाली एनडीएतून आलेली रॉकेट्स भेदून नष्ट करण्याचे सामर्थ्य गोव्यातील कॉंग्रेस पक्षात आहे असे गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे. गोवा फाॅरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केलेल्या टिकेला चोडणकर यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद कंत्राटी पद्धतीचे आहे अशी टिका सरदेसाई यांनी शनिवारी केली होती. 

ड्रग्ज माफियांवर जरब बसविण्यासाठी चांगला अधिकारी नेमण्याची गरज - विनोद पालेकर 

गृहमंत्री अमित शहा यांच्या नियंत्रणाखाली असलेल्यानी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतून बाहेर पडण्याची धमक दाखवावी व मगच विरोधी पक्षांच्या एकतेची भाषा बोलावी असा सल्ला गिरीश चोडणकर यांनी सरदेसाई यांना दिला आहे. आज गोव्यातील काही प्रादेशीक पक्ष अफवा पसरवून कॉंग्रेस पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कॉंग्रेस कमकुवत असल्याचे भासवून भाजप बरोबर परत एकदा सत्ता भोगण्याचे डाव ते आखत आहेत. परंतु, गोमंतकीय जनता शहाणी असून असल्या प्रादेशीक संधीसाधूंचा छुपा अजेंडा आता सगळ्यांना कळून चुकला आहे असे चोडणकर म्हणाले. 

''सर्व पालिका आणि महापालिका निवडणूक एकत्र घ्याव्यात''

गोमंतकीयांना कॉंग्रेस पक्ष प्रामाणिकपणे पूढे आलेला हवा असून आम्ही जनतेला उत्तरदायी रहावे अशी लोकांची अपेक्षा आहे. मागील अनुभवांचा विचार करुन आता आम्ही लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणार आहोत. भाजप व त्यांचे सहकारी तसेच त्यांच्या अ. ब व क संघांचा कॉंग्रेसने पराभव करावा हीच लोकांची अपेक्षा आहे असे चोडणकर म्हणाले. 

संबंधित बातम्या