Congress Protest: गोवा प्रदेश कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे बैल गाडी घेउन शहरात निदर्शने

Goa Pradesh Congress
Goa Pradesh Congress

पणजी: राजधानीतील(Panaji)  पेट्रोल पंपावर(Petrol) केंद्र सरकारचा इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी गोवा प्रदेश कॉग्रेसच्या(Goa Pradesh Congress Sevadal) पदाधिकाऱ्यानी बैल गाडी घेउन शहरात निदर्शने केली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. किंमती वाढविण्याच्या विरोधात कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते आज देशातील विविध पेट्रोल पंपांजवळ निषेध करीत आहेत.(Goa Pradesh Congress office bearers take bullock carts and protest in the city)

गोवा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, इंधन दरवाढ प्रकरणी पणजी शहरातील पेट्रोल पंप जवळ बैलगाडी घेवून निदर्शने करीत आहे. त्याचबरोबर इंधन दरवाढ प्रकरणी यूवा कोग्रेस सचिव अरचीत शांताराम  नाईक विरोधीपक्ष  नेते दिगंबर कामत सह मडगाव शहरात असलेल्या पेट्रोल पंपावर  विषेध करत आहे. आणि गोव्याीतल वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंप जवळ देखील काही नेते प्रतिकात्मक निदर्शनात सामील झाले आहेत.

देश सध्या कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेशी जनता झुंज देत आहे. अशा परिस्थितीत हे निदर्शने करतांना कोरोना विषाणू संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसने या निषेधला आक्रोश दिवा असे नाव दिले आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com