Haath Se Haath Jodo Yatra : राज्याच्या भवितव्यासाठी भाजपला सत्ताभ्रष्ट करा!

आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे आवाहन
Haath Se Haath Jodo Yatra
Haath Se Haath Jodo YatraDainik Gomantak

Haath Se Haath Jodo Yatra : भाजपने देशात व राज्यात फोडाफोडीचे राजकारण करून कटुता निर्माण केली. आज गोव्याचे भवितव्य तुमच्याच हातात असून मतभेद विसरून भाजपला सत्ताभ्रष्ट करणे गरजेचे आहे, असे आवाहन आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.

गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने राज्यात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू केले असून, मांद्रे विधानसभा क्षेत्र एक व त्या मतदारसंघातील बूथ एक केरी-तेरेखोल पंचायत क्षेत्रात सुरू केले.

Haath Se Haath Jodo Yatra
Margao Municipality : मडगाव पालिकेत पेच; डेटा एन्ट्री ऑपरेटर्सचे वेतन कोण देणार?

यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, रमाकांत खलप, बाबी बागकर, प्रदीप देसाई, गट अध्यक्ष नारायण रेडकर, रामचंद्र केरकर, तेरेखोलचे पंच गुदिन्हो उपस्थित होते.

खासदार फ्रान्सिस सर्दिन म्हणाले की, खासदारकीच्या काळात गोव्यात अनेक योजना व प्रकल्प साकारले त्याचे श्रेय भाजप घेत आहे. म्हादईबाबत लोकसभा काळात आवाज उठवणार असून भाजपच्या अविचारी कृत्याला जाब विचारण्याची ताकद काँग्रेस पक्षात आहे.

यावेळी मांद्रे गट अध्यक्ष नारायण रेडकर यांनी ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाला मतदारसंघातील मतदारांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.

Haath Se Haath Jodo Yatra
Bus Service : आंतरराज्य बसचालकांचा मनमानी कारभार

"आम्ही म्हादईप्रश्नी राजीनामा देण्याची तयारी दाखविली. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमची मागणी धुडकावून लावली. भाजप दादागिरी करीत असून विधानसभा अधिवेशन चार दिवसांचे केले. यावरून भाजप सरकार जनतेला घाबरत आहे. प्रत्येक प्रश्नावर आम्ही आवाज उठवू. जनतेने कॉंग्रेसला साथ द्यावी."

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com