Goa: डॉ.प्रमोद सावंत यांचे सकुरच्या सरपंचाची खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न

सरकार (Government) या तारखा जाहिर करण्यास मुद्दाम उशीर करत आहे असा आरोप पंचानी केला.
Goa: डॉ.प्रमोद सावंत यांचे सकुरच्या सरपंचाची खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न
Dr Pramod SawantDainik Gomantak

पणजी: सकुरचे सरपंच (Sarpanch) संदीप वझरकर यांची खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री (CM)डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी बरेच प्रयत्न केले. वझरकर यांच्यावर सुकूर येथील जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री त्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावल्यामुळे मुख्यमंत्र्याचा सुकूर जमीन घोटाळ्यात हात तर नाही? असा प्रश्‍न पर्वरीचे अपक्ष आमदार(MLA) रोहण खंवटे यांनी उपस्थित केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी (Media)बोलताना आमदार खंवटे म्हणाले, मुख्यमंत्र्यानी या प्रकरणाचा खुलासा करावा. अशी मागणी त्यांनी केली आहे. सुकूरचे सरपंच संदीप वझरकर यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल झाल्यानंतर तो संमत होऊ नये यासाठी सरकारने वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले.

Dr Pramod Sawant
Goa: राष्ट्रीय महामार्गाविषयी प्रमोद सावंत यांची नितीन गडकरींशी चर्चा

मुख्यमंत्र्यानी या प्रकरणी पंचायत संचालकावर दबाव आणला. असा आरोप आमदार खंवटे यांनी यावेळी केला. संदीप वझरकर यांच्यावर नुकताच अविश्‍वास ठराव संमत झाला असून भाजपकडे असलेली सुकूर पंचायत आता आमदार खंवटे यांच्या गटाकडे आली आहे.

दरम्यान सकुरच्या आमदार खंवटे यांच्या गटाच्या पंच सदस्यानी नव्या सरपंचाच्या निवडीसाठीची तारीख लवकर जाहीर करण्याची मागणी केली आहे. सरकार मुद्दाम या तारखा जाहिर करण्यास उशीर करत आहे असा आरोप या पंचानी केला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com