प्रतिमा कुतिन्हो यांचा आप प्रवेश; केजरीवालांची घेतली भेट

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मार्च 2021

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन आपमध्ये प्रवेश केला. 

मडगाव ः काॅंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपद व सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी आज दिल्ली येथे आम आदमी पार्टीचे (आप) प्रमुख व  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन आपमध्ये प्रवेश केला. (Goa Pratima Coutinho joins AAP meets Kejriwal in Delhi)

गोव्यात सरकारी पातळीवर शिगमोत्सव साजरा केला जाणार नाही

जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर कुतिन्हो यांनी काॅंग्रेसचे स्थानिक आमदार लुईझीन फालेरो व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांना टिकेचे लक्ष्य केले होते. आज त्यांनी दिल्ली येथे केजरीवाल यांची भेट घेऊन आपमध्ये प्रवेश केला. 

संबंधित बातम्या