गोवा: 'प्रतिमा कुन्तिहो योग्य उमेदवार नव्हत्या' फ्रान्सिस सार्दीन यांचं वक्तव्य

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

कुतिन्हो या निवडणुकीत उमेदवार म्हणून योग्य नव्हत्या असेही त्यांनी सूचित केले. 

मडगाव : प्रतिमा कुतिन्हो यांना सहा महिन्यांपूर्वी आम आदमी पार्टी (आप) आॅफर होती असे सांगण्यात येते. ही आॅफर स्विकारून सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी काॅंग्रेस पक्ष सोडून आपमध्ये प्रवेश केला असता तर नावेली झेडपी पोटनिवडणुकीत काॅंग्रेसचा उमेदवार सहजपणे निवडून आला असता अशी कुत्सित टिप्पणी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी केली आहे. कुतिन्हो या निवडणुकीत उमेदवार म्हणून योग्य नव्हत्या असेही त्यांनी सूचित केले. 

नावेली झेडपी पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर काॅंग्रेसच्या उमेदवार व गोवा प्रदेश महिला काॅंग्रेसच्या माजी अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी काॅंग्रेस नेत्यांवर टिका करून काॅंग्रेस पक्ष सोडला व आपमध्ये प्रवेश केला. आपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांनी काॅंग्रेस नेत्यांवर टिका करण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे.(Goa Pratima Kuntiho was not a suitable candidate statement by Francis Sardine)

'कोळसा व सीझेडएमपीवर श्वेत पत्रिका काढा' खासदार सार्दीन यांनी केली...

सार्दीन यांनी मडगावात पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर `कुतिन्हो यांना आपची सहा महिन्यांपूर्वी आॅफर असती तर त्यांनी आधीच काॅंग्रेस पक्ष सोडायला हवे होते` असे मत व्यक्त केले. कुतिन्हो यांनी सहा महिन्यांपूर्वी आपमध्ये प्रवेश केला असता, तर नावेलीच्या झेडपी  पोटनिवडणूकीत कॉग्रेसचा उमेदवार सहजपणे निवडून आला असता. निवडणूक जिंकणे हे पक्षाच्या उमेदवारीवर नव्हे तर उमेदवारावर अवलंबून असते. मतदारांची उमेदवारप्रती स्विकृतीही महत्वाची असते, असे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी सांगितले.

आपण जेव्हा लोकसभा निवडणुकीस उभा राहिलो तेव्हा आजोबा रिंगणात उतरले असे किस्से सांगण्यात येऊ लागले. पण, राजकारणात वय महत्वाचे नाही, वय म्हणजे निव्वळ एक संख्या आहे. कामगिरीला महत्व आहे. राजकारणात तरुण हवेतच, पण कर्तबगार व  जिंकण्याची क्षमता असलेल्यांचीही येथे गरज आहे, असे सार्दीन यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या