Goa: दुहेरी ट्रॅकसाठी कासावली येथील खांबांची बेकायदा उभारणी रोखली

कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा व गोयचो एकवोटची धडक कामगिरी (Goa)
MLA Alina Saldhana and Goemcho Ekvott while stopping the work of Railway Double Tracking (Goa)
MLA Alina Saldhana and Goemcho Ekvott while stopping the work of Railway Double Tracking (Goa)Dainik Gomantak News

दक्षिण पश्चिम रेल्वे प्राधिकरणाने (South Western Railway Authority) बेकायदेशीरपणे झाडे कापून दुहेरी ट्रेकिंगसाठी कासावली (Cassavalim) येथील खाजगी जमिनीत खांबांची बेकायदा उभारणी सुरू केली असता कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा (Cortalim MLA Alina Saldhana) तसेच गोयचो एकवोट (Goemcho Ekvott) आणि कासावली आरोसी (Aarosim - Cassavalim) येथील नागरिकांनी हस्तक्षेप करून रेल्वे अधिकाऱ्यांना साइटवरून खांब काढून ते घेऊन जाण्यास परावृत्त केले. मुरगाव बंदर ते हुबळी (Mormugoa Port to Hubali) पर्यंत होणाऱ्या रेल्वे दुपदरी रुळाला (Railway Double Tracking) केंद्रीय अधिकार प्राप्त समितीने विरोध दर्शवला असताना, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दुपदरी रेल्वे रुळाचे बेकायदेशीर काम वेगाने चालू केले आहे. वास्को मुरगाव बंदर ते होस्पेट हुबळी घाट पर्यंत कोळसा निर्यात (For Coal Export) करण्यासाठी दुपदरी करणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. (Goa)

Illegally cut down trees for Railway Double Tracking (Goa)
Illegally cut down trees for Railway Double Tracking (Goa) Dainik gomantak

दरम्यान आज सकाळी कासावली येथे रेल्वे प्रधिकरणाने खाजगी जमीन बेकायदेशीररित्या झाडे कापून तेथे खांब पुरून कुंपण घालण्याचे काम सुरू केले असता, गावकऱ्यांना यांची माहिती मिळताच कासावली, आरोसी येथील ग्रामस्थ एकवटले. तसेच त्यांनी याची माहिती आमदार एलिना साल्ढाणा व गोयचो एकवोट या संघटनेला देताच ते तेथे दाखल झाले व रेल्वेने चालवलेले हे बेकायदेशीर कुंपणाचे काम थांबवले व खांब उखडून टाकले. यावेळी उपस्थित आमदार साल्ढाणा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना साइटवरून खांब हटविण्यास भाग पाडले. गोयचो एकवट सहसचिव ओलेन्सिओ सिमाईस यांनी रेल्वे प्राधिकरण जमिनीच्या कायद्याला न जुमानता सतत बेकायदेशीर कारवाया करत आहे. जेव्हा मी रेल्वे अधिकाऱ्यांना त्यांच्या वैध परवानगी बद्दल विचारले असता ते कोणतेही तपशील देऊ शकले नाही. परंतु त्याऐवजी त्यांनी आमच्या जमिनी जबरदस्तीने घुसखोरी केली आणि आमची झाडे कापली असल्याचे ते म्हणाले.

MLA Alina Saldhana and Goemcho Ekvott while stopping the work of Railway Double Tracking (Goa)
Goa: पैकुळ सत्तरीत तातडीने पुल बांधावा; अन्यथा आंदोलन

वेलसाव, कासावली पंचायतीच्या कार्यक्षेत्रात भूसंपादनास आक्षेप घेण्याचा ठराव मंजूर केला होता. तरीही रेल्वे गावकऱ्यांना अधिग्रहण करण्यास भाग पाडत आहेत. गोयचो एकवटचे संस्थापक ओरविले रॉड्रिगीस यांनी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अधिकार प्राप्त समितीला आरोपाचे मूल्यमापन करण्याचे निर्देश दिले. तरीही मालकी हक्क नसलेल्या रेल्वेने जमीन अधीग्रहण प्रक्रियेवर जमीन मालकांनी आक्षेप घेतल्यानंतरही ग्रामस्थांवर अधिग्रहणाचा दबाव टाकला असल्याचे ते म्हणाले. स्थानिक आमदार एलिना साल्ढाणा यांनी रेल्वे विकास निगम लिमिटेडचे महाव्यवस्थापक एस बी साहू यांना फोन करून हे काम तातडीने थांबवण्यास सांगितले आणि त्यांना कासावली गावात त्यांच्या तथाकथित रेल्वे हद्दीला कुंपण घालण्यासाठी उभारलेले सर्व खांब काढून टाकण्यास प्रवृत्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com