गोव्यात पेट्रोलच्या दराने शतकाकडे सुरू केली वाटचाल

UNI
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

सर्वांत स्वस्त पेट्रोल म्हणून राष्ट्रीय पातळीवर २०१२ मध्ये चर्चेत आलेल्या गोव्यात पेट्रोलच्या दराने शतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. राजधानी पणजीत आज पेट्रोलचा दर ८३ रुपये ४२ पैसे प्रती लिटर होता.

पणजी - सर्वांत स्वस्त पेट्रोल म्हणून राष्ट्रीय पातळीवर २०१२ मध्ये चर्चेत आलेल्या गोव्यात पेट्रोलच्या दराने शतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. राजधानी पणजीत आज पेट्रोलचा दर ८३ रुपये ४२ पैसे प्रती लिटर होता. गोवा सरकारने मूल्यवर्धित करात दोन टक्के वाढ करून तो कर २७ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर १ रुपया ३० पैशांनी वाढणार आहे.

सरकारने २०१२ मध्ये पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर ०.०१ टक्के इतका कमी करण्यात आला होता. हळूहळू त्यात सरकारने वाढ केली. सुरवातीला पेट्रोलचे दर ६० रुपये प्रती लिटरच्या वर जाऊ देणार नाही, असे सरकार सांगत होते. त्यानंतर ही मर्यादा ६५ रुपयांपर्यंत सरकारनेच वाढवली. मात्र, त्यानंतर पेट्रोलचे दर वाढतच गेले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात इंधनावर अधिभार लावण्याची तरतूद केल्यावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मुल्यवर्धित कर कमी करणार का? अशी विचारणा केली होती.

त्यावेळी त्यांनी तसा काही विचार नसल्याचे स्पष्ट केले होते. याउलट आज करात वाढ करण्यात आली आहे. डिझेलवरील करात एक टक्का वाढ करण्यात आली आहे. यामुळे गोव्यात पेट्रोल एक रुपये ६० पैसे तर डिझेल ८६ पैशांनी महागणार आहे. सध्या डिझेलचा दर प्रतीलिटर ८६ रुपये २५ पैसे आहे.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या