जीवन सार्थकी लावण्यास गुरूंचे
मागदर्शन आवश्यक : विश्वनाथ स्वार
Goa: Vishwanath Swar inaugurating the programDainik Gomantak

जीवन सार्थकी लावण्यास गुरूंचे मागदर्शन आवश्यक : विश्वनाथ स्वार

Goa: जीवन सार्थकी लावण्यास गुरूंचे मागदर्शन आवश्यक असते असे उदगार प्राचार्य विश्र्वनाथ स्वार यांनी काढले.

फातोर्डा: प्रत्येकाच्या जिवनात गुरूंचे अस्तित्व असणे महत्वाचे आहे. गुरू योग्य मार्गदर्शन करतो व मौलिक सल्ला देत असतो. त्यांचे मार्गदर्शन हे जीवन सार्थकी लावण्यास आवश्यक असते असे उदगार एमईएस उच्च माध्यमिकाचे प्राचार्य विश्र्वनाथ स्वार यांनी काढले.
अंबिका योग कुटीरच्या गोवा विभागाने दाभोळ येथील एन व्ही इको फार्ममध्ये आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. गुरूंची निवड करताना, त्यांना समजुन घेताना प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

Goa: Vishwanath Swar inaugurating the program
Goa: 'माय बाप सरकार आम्हाला घर उभे करण्यास आर्थिक मदत कधी करणार'?

अंबिका योग कुटीरचे उपाध्यक्ष स्वार, उदय नाईक, समीर हेदे यांनी दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर गायत्री व मृत्यूंजय मंत्राचे पठण करण्यात आले. कुमार पेडणेकर, प्रमोद कामत, वकील शायनी नाईक यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजयानंद कालेकर यांनी केले तर अस्मिता प्रियोळकर हिने सर्वाचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास समीर हेदेसह प्रिसिला पेडणेकर व विभा स्वार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Goa: Vishwanath Swar inaugurating the program
Kargil Vijay Diwas: गोव्यात कारगिल युद्धाच्या स्मृतींना उजाळा

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com