Goa Police: बढती मिळाली, पण पुढे काय? अधिकाऱ्यांना लागली कार्यभाराची प्रतीक्षा

Goa Police खात्यात अधीक्षकपदी बढती दिलेल्या दहा अधिकाऱ्यांना महिना उलटला तरी अजून कार्यभार दिलेला नाही.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police: खात्यात अधीक्षकपदी बढती दिलेल्या दहा अधिकाऱ्यांना महिना उलटला तरी अजून कार्यभार दिलेला नाही. त्यामुळे विद्यमान आठ पोलिस अधीक्षकांकडे अनेक विभागांचा अतिरिक्त ताबा आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कामाचा ताण आहे. बढती मिळाली, पण पुढे काय, अशा विवंचनेत हे अधिकारी कार्यभाराची वाट पाहात आहेत.

खात्यात सध्या 10 उपअधीक्षक आणि 333 उपनिरीक्षकांच्या जागा रिक्त आहेत. क्राईम ब्रँचचे अधीक्षक निधीन वाल्सन यांच्याकडे अमली पदार्थविरोधी कक्ष, आर्थिक गुन्हे तसेच दक्षता अधिकारी पद, उत्तर गोवा अधीक्षक शोभित सक्सेना यांच्याकडे एसआयटी (खाण), अतिरेकीविरोधी कक्ष, बिनतारी संदेश तसेच पिंक फोर्स विभाग आहेत.

Goa Police
Panjim 'एटीएम' समोर रात्री रंगतात मद्यपींच्या मैफल

तसेच, सुरक्षा अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्याकडे आयआरबी कमांडंट, एफआरआरओ, पोलिस नियंत्रण कक्ष, पोलिस मुख्यालयाचे अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांच्याकडे गृहरक्षक दलाचे डेप्युटी कमांडंट पद, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच वाहतूक पोलिस विभाग, पोलिस मुख्यालयाचे अधीक्षक - 2 असलेले बॉस्युएट सिल्वा यांच्याकडे तपास व दक्षता, निवडणूक कक्ष, मोटार वाहन कक्ष, विशेष शाखा यांचा अतिरिक्त कार्यभार आहे.

या अधीक्षकांकडे नियमित कार्यभाराव्यतिरिक्त 3 ते 4 विभागांचा अतिरिक्त ताबा आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाज हाताळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. गणेश चतुर्थीपूर्वी सरकारने 10 उपअधीक्षकांना बढती दिली होती. मात्र, महिना उलटला तरी कार्यभार मिळत नसल्याने त्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यांच्या कार्यभाराचा आदेश कार्मिक खात्याकडून काढण्यास विलंब होत असल्याने या अधिकाऱ्यांची धास्तीही दिवसेंदिवस वाढत आहे.

Goa Police
Panjim मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दिवसाढवळ्या फोडले फ्लॅट

तब्बल 1,904 कर्मचाऱ्यांची उणीव

* एकूण 17 अधीक्षक आहेत. त्यात 4 आयपीएस तर 13 जीपीएस गोवा पोलिस सेवा (Goa Police Service) आहेत. बढती दिलेल्या 10 जणांना कार्यभार दिला नसल्याने या तिघांनाच गाडा ओढावा लागतो.

* 42 उपअधीक्षकांपैकी 32 उपअधीक्षक आहेत, तर 10 जागा रिक्त आहेत. या भरताना 60 टक्के खात्यातील तर 40 टक्के थेट भरती केली जाणार आहे. 610 उपनिरीक्षकांपैकी 277 सेवेत आहेत, तर 333 जागा रिक्त आहेत.

* पोलिस कर्मचारी संध्या 7,723 मंजुरी, 5,819 सध्या सेवेत असून, 1904 चा तुटवडा आहे.

शेखर प्रभुदेसाई, पोलिस अधीक्षक, मुख्यालय-

पोलिस मुख्यालयात प्रशासकीय कामकाज खूप असते. त्यातून वेळ काढून संध्याकाळी वाहतूक पोलिस विभागातील फाईल्स हातावेगळ्या कराव्या लागतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अधूनमधून जातो. मात्र, तेथील फाईल्स हाताळण्यास वेळ मिळत नाही. बढती मिळालेल्या अधीक्षकांना कार्यभार सोपवल्यास थोडा ताण कमी होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com