मनोरुग्ण बहिणीकडून चाकू हल्ल्यात आईला वाचवताना भाऊ जखमी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

कुळे पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी दिलेल्या माहितीवरून हर्षा दलकर (३६), केशव दलकर (३८) व त्यांची आई असे कुटुंब मुर्गे येथे राहातात. गेल्या काही दिवसांपासून हर्षा व आईमध्ये बाचाबाची होत होती. 

मुर्गे: साकोर्डा येथे मनोरुग्ण बहिणीने भावाला स्वयंपाकी चाकूने भोसकले. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. कुळे पोलिसांनी संशयित बहिणीला अटक केली आहे. भावाला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सुधारत असून इस्पितळात उपचार सुरू आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.

कुळे पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी दिलेल्या माहितीवरून हर्षा दलकर (३६), केशव दलकर (३८) व त्यांची आई असे कुटुंब मुर्गे येथे राहातात. गेल्या काही दिवसांपासून हर्षा व आईमध्ये बाचाबाची होत होती. 

आज सकाळी पुन्हा त्यांच्यात भांडण झाले व हर्षा हिने स्वयंपाकी चाकूने आईवर हल्ला करण्यास धावली असता केशव याने तिला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने केलेल्या हल्ल्यात चाकूचा वार केशव याच्या पोटावर झाल्याने रक्तबंबाळ झाला. त्याला त्वरित इस्पितळात दाखल करण्यात आले. 

हर्षा ही विवाहित असून तिचे सासरी पटत नसल्याने ती माहेरी राहत होती. ती मनोरुग्ण उपचार घेत होती. तिला अटक करण्यात आल्यानंतर केलेल्या तपासणीत ती मनोरुग्ण असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे तिला कोठडी घेऊन मनोरुग्ण इस्पितळात रवानगी केली जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या