Goa: पं. दीनदयाळ उपाध्याय यांना डिचोलीत भाजपकडून आदरांजली

पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच भाजप मजबूत आहे, असे उद्गार मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी काढले.
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती दिनानिमित्त मायेचे आमदार प्रवीण झांट्ये व मये भाजप मंडळाकडून डिचोलीत आदरांजली वाहण्यात आली.
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती दिनानिमित्त मायेचे आमदार प्रवीण झांट्ये व मये भाजप मंडळाकडून डिचोलीत आदरांजली वाहण्यात आली. Dainik Gomantak

Goa: जनसंघाचे संस्थापक सदस्य विचारवंत पं. दीनदयाळ उपाध्याय (Pt. Deendayal Upadhyay Anniversary) यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच भाजप मजबूत आहे. असे उद्गार मयेचे आमदार प्रवीण झांट्ये (MLA Pravin Zantye) यांनी काढले. प्रत्येकांनी त्यांचा आदर्श जोपासावा, असे आवाहनही त्यांनी केले. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती दिनानिमित्त मये भाजप मंडळाकडून डिचोलीत (Bicholim BJP) आयोजित कार्यक्रमात आमदार झांट्ये बोलत होते.

पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती दिनानिमित्त मायेचे आमदार प्रवीण झांट्ये व मये भाजप मंडळाकडून डिचोलीत आदरांजली वाहण्यात आली.
Goa: राजकारणी केंद्रातून मिळणाऱ्या पैशावर ताव मारण्यात व्यस्त; गोवा सुरक्षा मंच

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, मयेचे उपसरपंच कृष्णा परब, पंच ऊर्वी मसुरकर, केतन मयेकर आदी उपस्थित होते. आमदार श्री. झांट्ये यांनी पं. दीनदयाळ यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. शंकर चोडणकर यांनीही पं. दीनदयाळ यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी उपस्थितांनी पं. दीनदयाळ यांना अभिवादन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com