लोकसेवा आयोगाकडून ४४ अधिकाऱ्यांच्या बढतीची शिफारस

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा दिलेल्या माहितीनुसार, एका आरोग्याधिकाऱ्यास मुख्य वैद्यकीय अधिकारीपदी बढती देण्याची शिफारस करण्यात आली आहे. पाच वर्षे सेवा बजावलेले आरोग्याधिकारी यासाठी पात्र ठरतात. एका वनक्षेत्रपालाला सहाय्‍यक वनसंरक्षकपदी बढती देण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

पणजी: गोवा लोकसेवा आयोगाने ४४ अधिकाऱ्यांच्या बढतीची शिफारस सरकारला केली आहे. खात्यांतर्गत बढती समितीच्या बैठकांनंतर आयोगाने या शिफारसी सरकारला केल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा यांनी दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोग्याधिकाऱ्यास मुख्य वैद्यकीय अधिकारीपदी बढती देण्याची शिफारस करण्यात आली आहे. पाच वर्षे सेवा बजावलेले आरोग्याधिकारी यासाठी पात्र ठरतात. एका वनक्षेत्रपालाला सहाय्‍यक वनसंरक्षकपदी बढती देण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

पाच वर्षे सेवा बजावल्यानंतर ही बढती मिळायला हवी. मात्र, शिफारस केलेला वनक्षेत्रपाल गेली १५ वर्षे त्या पदावर काम करत आहे. जलसंपदा खात्यातील पर्यवेक्षक अभियंतापदी दोन अधिकाऱ्यांना बढती द्यावी अशीही शिफारस करण्यात आली आहे. जपलसंपदा खात्यातील सहा कार्यकारी अभियंता, ३१ सहायक अभियंता आणि सचिवालयातील तीन कक्षाधिकाऱ्यांचा प्रोबेशन कालावधी समाप्त करण्याचीही शिफारस आयोगाने केली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या