गोवा लोकसेवा आयोग करणार 'या' पदांची भरती मिळणार 40 हजारांपर्यत वेतन

इच्छुक उमेदवारांनी गोवा लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देवू शकतात
गोवा लोकसेवा आयोग करणार 'या' पदांची भरती मिळणार 40 हजारांपर्यत वेतन
Goa Public Service Commission Recruitment 2021Dainik Gomantak

Goa PSC Recruitment 2021: गोवा सरकारने आतापर्यंत अनेक पदांची भरती केली आहे. जे लोक सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. गोवा लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार (Goa Public Service Commission Recruitment 2021) सहाय्यक प्राध्यापक आणि व्याख्याता या पदांसाठी भरती केली जाणार आहे. सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता अशी एकूण 6 पदे काढण्यात आली आहेत. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते गोवा लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया खाली तपशीलवार दिली आहे.

Goa Public Service Commission Recruitment 2021
गोवा भाजप सरकारकडून रोजगाराच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल

अर्ज करण्याची प्रक्रिया

इच्छुक उमेदवारांनी गोवा लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. gpsc.goa.gov.in या संकेत स्थळावर जावून आपण अर्ज दाखल करू शकता. या वेबसाइटला भेट दिल्यास, तीन क्रमांकावर आपल्याला भरतीचा पर्याय दिसेल. येथे तुम्हाला Apply Online या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि आपला अर्ज सबमीट करा. मात्र त्याआधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला अर्ज भरता येणार. हा अर्ज योग्यरित्या भरा आणि तो भरल्यानंतर, फॉर्मची प्रिंट काढा. लक्षात ठेवा अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर 2021 आहे.

Goa Public Service Commission Recruitment 2021
MMC Building Scam: गोव्यात पुन्हा भाजप विरुद्ध भाजप

रिक्त पदांची माहिती

न्यूरोलॉजीमध्ये सहाय्यक प्राध्यापकाच्या 2 पदांसाठी आणि रेडिओलॉजी लेक्चरर आणि सर्जरीच्या लेक्चरशीपसाठी प्रत्येकी एक-एक पदांची भरती केला जाणार आहे. या चारही पदांची भरती गोवा मेडिकल कॉलेजमध्ये केली जाणार आहे. त्याचबरोबर जूनियर फिजिशियनचे पद काढून टाकण्यात आले आहे. जे आरोग्य सेवा संचालनालयात आहे. त्याचबरोबर गोवा डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विषयाच्या लेक्चररचे एक पद काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता या 4 पदांसाठीच ही संपूर्ण भरती प्रक्रिया गोवा लोकसेवा आयोगाद्वारे (Goa PSC Recruitment 2021) घेतली जाणार आहे.

वेतनश्रेणी

या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 15,600-39,100+6,600 वेतन देण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com