Goa PWD Recruitment: गोवा सरकार करणार 368 पदांची भरती

Goa PWD भरती अंतर्गत विविध विभागांमध्ये तांत्रिक सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता पदांवर भरती केली जाणार
Goa PWD Recruitment: गोवा सरकार करणार 368 पदांची भरती
Goa PWD RecruitmentDainik Gomantak

सरकारी नोकऱ्यांची (Government Job) तयारी करणाऱ्या युवकांसाठी पीडब्ल्यूडी (PWD) विभागाकडून एक आनंदाची बातमी आहे. पीडब्ल्यूडी विभागात विविध पदांसाठी भरती सुरू आहे. ही भरती गोवा सरकारच्या (Goa Government) पीडब्ल्यूडी विभागातर्फे केली जात आहे. विभागाने गट क श्रेणीतील 368 पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. गोवा पीडब्ल्यूडी भरती अंतर्गत विविध विभागांमध्ये तांत्रिक सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता पदांवर तात्पुरती भरती केली जाणार आहे. अधिसूचनेनुसार, गोवा पीडब्ल्यूडी विभागाच्या वेबसाइट pwd.goa.gov.in ला भेट देऊन आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 आहे.

Goa PWD Recruitment
Goa Mining: राज्यातील खाणकाम तीन वर्षांपासून बंद,अर्थचक्राला 20 हजार कोटींचा फटका
  • रिक्त पदांची सख्या

तांत्रिक सहाय्यक सिव्हिल - 85 पद

तांत्रिक सहाय्यक मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल - 14 पद

तांत्रिक खाण सहाय्यक - 01 पोस्ट

तांत्रिक सहाय्यक संगणक/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी - 24 पदे

कनिष्ठ अभियंता सिव्हिल - 162 पदे

कनिष्ठ अभियंता यांत्रिक/विद्युत - 51 पदे

कनिष्ठ अभियंता संगणक/ इलेक्ट्रॉनिक्स/आयटी -24 पदे

  • आवश्यक शैक्षणिक पात्रता

तांत्रिक सहाय्यक पदासाठी, संबंधित ट्रेडमध्ये अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

कनिष्ठ अभियंता- कनिष्ठ अभियंता पदासाठी संबंधित ट्रेडमधिील पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

Goa PWD Recruitment
Ganesh Chaturthi in Goa: गणेशभक्तांना नाही खर्चाची पर्वा
  • वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेंदवाराचे कमाल वय 45 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.

  • PWD भरती 2021 वेतनश्रेणी

तांत्रिक सहाय्यक-स्तर-6: 35,400-1,12,400 रुपये प्रति महिना

कनिष्ठ अभियंता-स्तर-5: 29,200 –92,300 रुपये प्रति महिना

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com