Goa Railway Passenger Service: " वास्को ते कुळे रेल्वे मार्गावर आता 'DEMU Train' धावणार "

‘डेमू’ ट्रेनच्या एका डब्यात 105 प्रवासी नेण्याची क्षमता (Goa Railway Passenger Service)
'DEMU Train' ( Goa Railway Passenger Service)
'DEMU Train' ( Goa Railway Passenger Service)Dainik Gomantak

Goa Railway Passenger Service: दक्षिण पश्चिम रेल्वेने वास्को - कुळे रेल्वे मार्गावर चालणारी ‘कंन्वेंश्नल रेक’ (Conventional Rec) बनावटीची ट्रेन हटवून गुरूवार (दि.२६) पासून या मार्गावर ‘DEMU’ (Diesel Electrical Multiple Unit) बनावटीची ट्रेन प्रवासी रेल्वे सेवेसाठी सुरू केली आहे. वास्को - कुळे मार्गावर ४२ कोटी रुपये खर्च करून दोन ‘डेमू ट्रेन’ सुरू केल्यापासून गुरूवारी सकाळी ७.३० वाजता वास्को रेल्वे स्थानकावरून पहिल्यांदाच ‘डेमू ट्रेन’ प्रवाशांना घेऊन कुळे येथे जाण्यासाठी रवाना झाली. ‘डेमू ट्रेन’ मध्ये प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध असून दक्षिण पश्चिम रेल्वेच्या (Southwestern Railway) हुबळी विभागाच्या मार्गावरील ही ‘डेमू ट्रेन’ पहिलीच प्रवासी रेल्वे सेवा ठरलेली आहे.

'DEMU Train' ( Goa Railway Passenger Service)
Goa Taxi: डिजिटल मीटरमध्ये असणार ‘ॲप’प्रमाणेच सुविधा

‘डेमू ट्रेन’ मध्ये जास्त गतीने प्रवास करण्याची क्षमता

वास्को ते कुळे व कुळे ते वास्को (Vasco To Kulem) या रेल्वे मार्गावर यापूर्वी ‘कंन्वेंश्नल रेक’ बनावटीची ट्रेन प्रवासी रेल्वे सेवा द्यायची. दक्षिण पश्चिम रेल्वेने गुरूवारपासून ती ट्रेन हटवून यामार्गावर प्रवासी रेल्वे सेवा देण्यासाठी ‘डेमू ट्रेन’ घातली आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा असण्याबरोबरच ही ट्रेन जास्त प्रवाशांना नेण्याची क्षमता ठेवते. पूर्वीच्या ट्रेनच्या एका डब्यात ९० प्रवासी नेण्याची क्षमता होती मात्र आता ‘डेमू’ ट्रेनच्या एका डब्यात १०५ प्रवासी नेण्याची क्षमता आहे. या ट्रेनमध्ये एकूण आठ डब्बे असल्याची माहिती दक्षिण पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागातून प्राप्त झाली. ‘डेमू ट्रेन’ पूर्वीच्या ट्रेन पेक्षा जास्त गतीने प्रवास करण्याची क्षमता ठेवते. तसेच या ट्रेनमध्ये दोन्ही बाजूने ‘ड्रायव्हींग कॅबीन’ (2 Sides Driving Cabin) असल्याने दोन्ही बाजूने ही ट्रेन चालवली जाऊ शकते. ४२ कोटी खर्च करून सुरु केलेल्या या दोन ‘डेमू ट्रेन’ दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील या डेमू बनावटीची पहीली प्रवासी रेल्वे सेवा ठरली आहे.

'DEMU Train' ( Goa Railway Passenger Service)
Goa Police: 'सावधान! पोलिस स्थानकातील कामकाजावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर'

‘डेमू’ ट्रेन दिवसाला ' वास्को ते कुळे ' अश्या ३ फेऱ्या मारणार

वास्को - कुळे व कुळे - वास्को या रेल्वे मार्गावर पूर्वी दिवसाला दोन प्रवासी रेल्वे सुविधा उपलब्ध होत्या, त्यात गुरूवारपासून वाढ करून आता दिवसाला तीन प्रवासी रेल्वे सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तिसरी प्रवासी रेल्वे आता कुळे रेल्वे स्थानकावरून दररोज दुपारी १२.२० वाजता निघाल्यानंतर ती ट्रेन दुपारी २.१० वाजता वास्कोला पोचणार. वास्को रेल्वे स्थानकावरून दुपारी १.०५ वाजता तिसरी प्रवासी रेल्वे निघाल्यानंतर ती दुपारी ३ वाजता कुळेला पोचणार आहे.अशी माहीती दक्षिण पच्छीम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून प्राप्त झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com