अखेर मॉन्सूनचे गोव्यात आगमन!

तब्बल 10 दिवसांनंतर सक्रिय : चक्रीय स्थितीमुळे रेंगाळला हाेता कारवारमध्ये
अखेर मॉन्सूनचे गोव्यात आगमन!
Goa Rain Update | Goa Monsoon NewsDainik Gomantak

पणजी : वेळेअगोदर बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबारमध्ये दाखल झालेला मॉन्सून केरळमध्येही तीन दिवस अगोदर दाखल झाला होता. मॉन्सूनचा पुढचा प्रवासही वेळेत सुरू असताना निर्माण झालेल्या विरोधी चक्रीय स्थितीमुळे तब्बल १० दिवस मॉन्सून कारवारमध्येच रेंगाळला होता. आता मॉन्सूनसाठीची पोषक स्थिती निर्माण झाल्याने शुक्रवारी किंवा उद्या शनिवारी मॉन्सून राज्यात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तवली आहे. (Goa Rain Update)

हवामान खात्याचे वैज्ञानिक एम. राहुल म्हणाले, मॉन्सूनसाठीची पोषक स्थिती अरबी समुद्रात तयार झाली असून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग वाढला आहे. समुद्रावरून येणारी आर्द्रता, वाढलेली ढगांची घनता लक्षात घेता मॉन्सून येत्या 48 तासांत राज्यात सक्रिय होईल. राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरूच असून राजधानी पणजीसह डिचोली, सत्तरी, वाळपई, सांगे, काणकोण तालुक्यांतील अनेक गावांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

दक्षिण-पश्‍चिम मॉन्सूनने केरळ आणि कर्नाटकात वेळेआधी हजेरी लावली असली, तरी पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती नसल्याने दक्षिणात्य भागांमध्ये तो १० दिवस रेंगाळला. मात्र, पूर्वोत्तर राज्यातील त्याची वाटचाल सुरूच होती. बंगालच्या उपसागराचा मध्य भाग पूर्वोत्तर राज्ये सिक्कीम आणि पश्‍चिम बंगालचा काही भाग मॉन्सूनने व्यापला आहे. आता नैऋत्य भागातून येणाऱ्या मौसमी वाऱ्यांचा वेग वाढल्याने मॉन्सून पश्‍चिम आणि मध्य भारताकडे वाटचाल करेल, अशी शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.

रात्री जोरदार हजेरी

राजधानी पणजीसह राज्याच्या अनेक भागांत गुरुवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री सर्व व्यवहार संपत आले असता पावसाने सुरुवात केल्याने जनजीवनावर तितका परिणाम जाणवला नाही. मात्र, काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. तसेच सखल भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com