Rain Update: स्मार्ट सिटी पणजी पुन्हा डबक्यात
Goa Rain UpdateDainik Gomantak

Rain Update: स्मार्ट सिटी पणजी पुन्हा डबक्यात

18 जून रस्ता असो किंवा पोलिस मुख्यालयासमोर रस्ता असो थोड्याशा पावसामुळे पाण्याखाली, रस्त्याकडेला ठेवलेले वाहने गुडघाभर पाण्यात

पणजी: पणजी ही स्मार्ट सिटी (Panjim Smart City) म्हणून विकसित होत असतानाच पणजी महापालिकेच्या दुर्लक्षामुळे पणजीच्या विविध भागांमध्ये थोडासा पाऊस पडला (Rain Update) तरी गुडघाभर पाणी साचते. असाच प्रकार पणजी येथील जुन्या सचिवालय समोर अर्थात आदिलशहा पॅलेस समोर वारंवार होताना दिसत आहे.

येथे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी गटाची बांधणी करण्यात न आल्यामुळे येथे थोड्याशा पावसाने गुडघाभर पाणी साचते . असाच प्रकार आज सकाळी अकरा ते बारा च्या दरम्यान पडलेल्या जोरदार पावसानंतर झाला आणि वाहने ठेवलेल्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचले.पणजीच्या विविध भागांमध्येही असाच प्रकार घडला. सर्वात जास्त वाहनांची वर्दळ असलेला 18 जून रस्ता असो किंवा पोलिस मुख्यालयासमोर रस्ता असो थोड्याशा पावसामुळे पाण्याखाली जातो व रस्त्याकडेला ठेवलेले वाहने गुडघाभर पाण्यात अडतात.

तसेच वाहनचालकांना वाहने चालवताना बराच त्रास सहन करावा लागतो. पणजीत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य निचरा व्यवस्था नसल्यामुळेच हा प्रकार घडत आहे. मळा पणजी भागात प्रत्येक पावसाळ्यात लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची प्रकार होतात .गेली अनेक वर्षे ही समस्या असूनही पणजी महापालिकेला योग्य असा तोडगा काढणे अध्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे नागरिकात नाराजी आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com