Goa Rain Updates : गोव्यात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता

हवामान खात्याचा अंदाज; किमान तापमानातही वाढ होणार
Goa Rain
Goa RainDainik Gomantak

Goa Rain Updates : गोव्यात शुक्रवार आणि शनिवारी काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोवा वेधशाळेद्वारे गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे गोव्यात मध्य-ट्रोपोशियरमध्ये आर्द्रता वाढल्याने राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत किमान तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढही होऊ शकते, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

गोव्यात सध्या वातावरण काहीसं ढगाळ पाहायला मिळत आहे. शेजारीच असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र गोव्यात तितकासा पाऊस पाहायला मिळाला नव्हता. दुसरीकडे गोव्यात सध्या कडाक्याची थंडीही सुरु झाली आहे. त्यामुळे सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याचं ऊन अशा प्रकारचं वातावरण गोव्यात पाहायला मिळत आहे. त्यातच आता पावसाची हजेरी लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Goa Rain
Rain In Vasco: अचानक पडलेल्या पावसामुळे वास्कोतील रस्ते निसरडे; तब्बल सहा दुचाकी घसरल्या

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मागच्या गोव्यात सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच मागच्या आठवड्यात वास्कोत अचानक पावसाची रीपरीप सुरू झाली. या पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने वास्कोत एचडीएफसी बँकेसमोर सहा दुचाक्या घसरून पडल्या. यात दुचाकीचालक किरकोळ जखमी झाले. रस्ता निसरडा झाल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमनच्या जवानांनी निसरड्या रस्त्यावर माती टाकत वाहन चालकांना कमी वेगात जाण्याचा सल्ला दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com